रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

 Mumbai
रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई - रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळ दुरुस्ती आणि तांत्रिक कामासाठी तिन्ही मार्गावर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

असा असेल मेगाब्लॉक 

पश्चिम रेल्वे - जम्बो मेगाब्लॉक चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊनवर रात्री 12.05 ते सकाळी 5.15 वाजेपर्यंत दुरुस्तीचे आणि तांत्रिक प्रणालीचे काम धिम्या मार्गावर चालू असेल. ब्लॉक दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर काही अप आणि डाऊन धीम्या लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हार्बर रेल्वे - हार्बर लाईनवर चुनाभट्टी ते माहिम दरम्यान दोन्ही मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत दुरूस्तीचे काम चालणार आहे. ब्लॉकदरम्यान सकाळी 11.30 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत चुनाभट्टी ते माहिम दरम्यान अप डाऊनवरील वाहतूक बंद असणार आहे.

मध्य रेल्वे - मेन लाईनवरील ठाणे ते कल्याण डाऊन मार्गावर 11.30 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत धीम्या मार्गावरील वाहतूक बंद राहणार आहे. तर जलद लोकल वेळेपत्रकानुसार धावणार आहेत.

Loading Comments