Advertisement

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक


रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक
SHARES

मुंबई - रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रुळांच्या दुरुस्ती आणि देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवार मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी प्रवाशांचे मेगाहाल होणार आहेत.

सेंट्रल रेल्वे -
मेन लाईनवर ठाणे ते माटुंगा स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉक दरम्यान ठाणे ते माटुंगा स्थानका दरम्यानची अप धिम्या मार्गावरील वाहतूक डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे. तसेच सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल सकाळी 11 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत आपल्या निर्धारीत वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे -

हार्बर मार्गावरील सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहिम अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.10 ते दुपारी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेल मार्गावर सकाळी 1.44 ते दु. 4.13 पर्यंत आणि सीएसटी ते वांद्रे आणि अंधेरीसाठी सुटणारी लोकल सेवा बंद राहणार. ब्लॉकदरम्यान पनवेल ते कुर्ला (प्लॅटफार्म-8) या मार्गावर विशेष लोकल चालविण्यात येतील.

पश्चिम रेल्वे -
पश्चिम रेल्वेवर रविवार सकाळी 11.30 ते दुपारी 2.00 पर्यंत बोरीवली ते भाईंदर रोड स्थानकापर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत जलद मार्गावरील सेवा धीम्या मार्गावरून चालेल.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा