रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

 Pali Hill
रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई - रविवार सुट्टीचा वार, मात्र नेहमीप्रमाणे प्रवाशांना मेगाब्लॉकचा सामना करावा लागणार आहे. या रविवारी मुंबईच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा रुळांची दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर दिवा ते कल्याण डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. या दरम्यान वाहतूक डाऊनच्या धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. सीएसटी ते ठाणे अप जलद मार्गावर कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. हार्बर मार्गावर कुर्ला वाशी या दोन्ही मार्गावर 11 वाजून 10 मिनिटांपासून ते 4 वाजून 10 मिनीटांपर्यंत ब्लॉक असणार आहे. यावेळी काही विशेष लोकल सीएसटी ते कुर्ला आणि वाशी ते पनवेल अशा चालवण्यात येणार आहेत. सर्व लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. मरीन लाईन्स ते माहीम स्टेशन दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान गाड्या डाऊन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यावेळी अनेक लोकल रद्द करण्यात आल्या आहेत असे पश्चिम आणि मध्य रेल्वेने सांगितले.

Loading Comments