SHARE

मुंबई - रविवारी, पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते मांटुगा, पश्चिम रेल्वेवर बोरिवली ते गोरेगाव आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते मानखुर्ददरम्यान मेगाब्लाॅक घेण्यात येणार असल्याने मुंबईकर प्रवाशांचे मेगाहाल होणार आहेत. त्यातच सकाळी साडे दहा ते दुपारी साडे बारा दरम्यान वांगणी ते भिवपुरीदरम्यान विशेष मेगाब्लाॅक घेण्यात येणार आल्याने मेगाब्लाॅकची झळ वाढणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवर दुरुस्तीचे काम सुरू असून यासाठी हा मेगाब्लाॅक घेण्यात आला आहे.

मेगा ब्लॉक - 
 मध्य रेल्वे - मुलुंड ते मांटुगादरम्यान सकाळी 11.20 ते 4.20 या काळात अप धिम्या मार्गावर
  पश्चिम रेल्वे -   बोरिवली ते गोरेगावदरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 दरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर. 
हार्बर मार्ग - नेरूळ ते मानखुर्ददरम्यान डाऊन मार्गावर सीएसटी ते पनवेल-बेलापुर-वाशी आणि अप हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसटीदरम्यान सकाळी 10.20 ते दुपारी 3.48 या वेळेत लोकलसेवा पूर्ण रद्द 

संबंधित विषय
ताज्या बातम्या