Advertisement

कोपरी ब्रिज गर्डर लॉचिंगसाठी ट्रॅफिक ब्लॉक


कोपरी ब्रिज गर्डर लॉचिंगसाठी ट्रॅफिक ब्लॉक
SHARES

मध्य रेल्वे मार्गावर शनिवार व रविवार दि. २३ व २४ जानेवारी रोजी आणि रविवार व सोमवार दि. २४ व २५ रोजी रात्री कोपरी रोड ओव्हर ब्रिजच्या रोड क्रेनद्वारे गर्डरचे कार्य करण्यात येणार आहे. या गर्डरच्या कामासाठी ठाणे ते मुलुंड स्थानकांदरम्यानच्या सर्व ६ मार्गावर विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

दोन्ही दिवशी मध्यरात्री १ ते  पहाटे ४ या कालावधीत ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून क्रेनद्वारे सायन व आटगाव स्थानकांवर फूट ओव्हर ब्रिजसाठी गर्डर टाकण्यासाठी २ शॅडो ब्लॉक सुद्धा घेण्यात येतील. सायन इथं ४ ही मार्गावर मध्यरात्री ००.४० ते पहाटे ४.४० वाजेपर्यंत आणि अटगाव येथे डाउन मार्गावर सकाळी ०२.२० ते पहाटे ०६.२० या दरम्यान सदर ब्लॉक चालविण्यात येतील. 

या ब्लॉकमुळे, उपनगरी रेल्वे खालीलप्रमाणे चालविण्यात येतील

२४ आणि २५ जानेवारी 

 • दादर ते ठाणे दरम्यान सकाळी ००.४० ते सकाळी ०५.०० या दरम्यान उपनगरी सेवा रद्द  राहतील. 
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ००.१५ वाजता सुटणारी कसारा लोकल रद्द राहील. 
 • ठाण्याहून ०१.१९ वाजता  सुटणारी कर्जतला जाणारी शेवटची लोकल असेल. 
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून पहिली लोकल सकाळी ०५.०० वाजता  सुटणारी कसारा लोकल असेल.  ठाणे येथून सकाळी ०५.१० वाजता सुटणारी पहिली लोकल कसारा करीता असेल. 
 • कर्जत येथून सकाळी ०३.४१ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करीता सुटणारी पहिली लोकल असेल. 
 • टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणारी पहिली लोकल सकाळी ०४.३२ वाजता टिटवाळा येथून सुटेल.

२३ व २४ जानेवारी 

 • दिनांक २३ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.२० वाजता टिटवाळा करीता जाणारी लोकल कसारा पर्यंत चालविण्यात येईल. 
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून अंबरनाथसाठी शेवटची लोकल सकाळी ००.०५ वाजता (२३/२४.०१.२०२१ मध्यरात्री) असेल. 
 • दि. २३.१.२०२१ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी शेवटची लोकल खोपोली येथून  रात्री १०.१५ वाजता सुटेल.

२४ व २५ जानेवारी

 • दिनांक २४ जानेवारी रोजी कसारासाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून मध्यरात्री  ००.०५ वाजता सुटेल आणि सर्व स्थानकांवर थांबेल. 
 • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शेवटची लोकल कुर्ल्यासाठी सकाळी ००.३१ वाजता (२४/ २५.१.२०२१ मध्यरात्री) सुटेल. 
 • दिनांक २४ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यासाठी शेवटची लोकल बदलापूर येथून रात्री ११.३१ वाजता सुटेल.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा