मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक


SHARE

मध्य रेल्वेवर रविवारी ओवरहेड वायर, रेल्वे ट्रॅकची दुरुस्ती अशा कारणांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याणदरम्यान रविवारी सकाळी १൦.३൦ ते दुपारी ३.३൦ वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान जलद गाड्या निर्धारित थांब्याव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. तसंच ठाणे आणि कल्याण स्टेशनदरम्यान धीम्या मार्गावर ही सेवा चालवण्यात येणार आहे.


हार्बर लाइनवरील मेगाब्लॉक

हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर लाइनवर सकाळी ११.१൦ ते ४.१൦ पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान सीएसटीएम-कुर्ला तसंच वाशी-पनवेल मार्गावर गाड्या चालवण्यात येतील. हार्बर लाइनवरील प्रवाशांना सकाळी १൦ ते ४.३൦ पर्यंत ट्रान्स हार्बर-मेनलाइनवरुन प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या