रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक

  Pali Hill
  रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक
  मुंबई  -  

  मुंबई - रेल्वेमार्गावरील महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

  मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा या स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते संध्याकाळी ४.२० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
  ब्लॉकदरम्यान अप धिम्या मार्गावरील गाड्या अप जलद मार्गावरून चालवल्या जातील.

  हार्बर रेल्वेच्या सीएसटी ते चुनाभट्टी - माहिम यांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते संध्याकाळी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
  ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील सीएसटीहून सुटणाऱ्या आणि सीएसटीपर्यंत येणाऱ्या सर्व सेवा रद्द राहतील. मात्र प्रवाशांच्या सेवेसाठी कुर्ल्याहून काही सेवा पनवेल-वाशीसाठी चालवल्या जाणार आहेत. ब्लॉकदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना अधिकृत तिकीट काढून मुख्य आणि पश्चिम मार्गाने प्रवास करता येणार आहे.

  पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल यांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
  दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील जलद गाडय़ा चर्चगेट ते मुंबई सेंट्रल यांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावरून चालवल्या जातील. त्यामुळे जलद तसेच धिम्या मार्गावरील काही सेवा रद्द करण्यात येणार आहेत. यामुळे वाहतूक २० ते २५ मिनिटे उशिरानं धावणार आहेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.