Advertisement

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक


रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक
SHARES

मुंबई - रेल्वे मार्गावरील रूळ दुरूस्तीसाठी आणि तांत्रिकी कारणांच्या कामांसाठी तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

पश्चिम रेल्वे -

सकाळी 10.30 ते दु. 1.30 पर्यंत वसई रोड ते विरार स्थानकापर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत धिम्या मार्गावरील सेवा जलद मार्गावरून चालेल. तसेच, काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे -

मध्य रेल्वेच्या मेन लाइनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दु. 3.30 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लॉकदरम्यान ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यानची डाउन धिम्या मार्गावरील वाहतूक डाउन जलद मार्गावरुन चालविण्यात येणार आहे. तसेच सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल सकाळी 11 ते संध्याकाळी 5 या वेळेत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर रेल्वे -

हार्बरवर पनवेल-नेरुळ अप आणि डाउन मार्गावर स. 11.20 ते दु. 4.20 पर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. सीएसटी ते पनवेल, बेलापूर मार्गावर स. 11.01 ते दु. 4.26 पर्यंत आणि पनवेल, बेलापूर ते सीएसटी मार्गावरील सेवा बंद राहील. या मार्गावर सीएसटी-नेरुळ आणि ठाणे-नेरुळ मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येतील.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा