Advertisement

मेट्रो-२अ, ७च्या मार्गिका जानेवारीत सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह

याबाबत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी म्हत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

मेट्रो-२अ, ७च्या मार्गिका जानेवारीत सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह
SHARES

मुंबईच्या पश्चिम उपनगरांना पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या मेट्रो-२अ आणि मेट्रो-७ या जानेवारीत सेवेत येण्याची शक्यता होती. पण आता हा प्रकल्प लाबणीवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचं कारण म्हणजे अद्याप दुसऱ्या टप्प्याची तांत्रिक तपासणी सुरू झाली नाही.

मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयाकडून (CMRS) ही तपासणी पूर्ण होणार आहे. आयुक्तालयाने बांधकाम परीक्षण पूर्ण केले असले तरी तांत्रिक परीक्षणाला विलंब होत आहे. परिणामी या मार्गिका जानेवारीत सुरू होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मेट्रो रेल्वे व्यावसायिकदृष्ट्या सुरू करण्याआधी त्याची सीएमआरएसकडून तपासणी व त्यांचे प्रमाणपत्र अत्यावश्यक असते. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तालयांतर्गत ही तपासणी केली जाते. त्यासाठी देशभरात तीन आयुक्तालये कार्यरत आहेत.

महामुंबईसह गुजरात आणि राजस्थानसाठीचे आयुक्तालय मुख्यालय मुंबईत आहे. कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडूसाठीचे आयुक्तालय बेंगळुरूमध्ये आहे. तर उर्वरित संपूर्ण देशासाठीचे आयुक्तालय कोलकात्यात आहे. मुंबईतील आयुक्तालयाने ही तपासणी पूर्ण करून त्याचा अहवाल मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) सोपविणे अपेक्षित आहे. पण आता तांत्रिक परीक्षण बाकी आहे.

याबाबत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांना विचारले असता, जानेवारीतच ही सेवा सुरू होईल असा पूर्ण प्रयत्न असेल, असे त्यांनी सांगितले.

'मेट्रो 2 अ' मार्ग असा असणार

'मेट्रो 2 अ' हा 18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.

'मेट्रो-7' मार्गावरील स्थानके

मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहेहेही वाचा

मुंबई: मेट्रो मार्ग 3 सीएसएमटी इथल्या मुख्य मार्गाशी जोडला जाणार

Mumbai Metro: लाइन 2B ठरणार गेम चेंजर, ३ मेट्रो मार्गांशी जोडली जाणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा