Advertisement

मुंबईत सुसाट गाडी चालवणं पडणार महाग, वेगाची नवीन मर्यादा जाहीर

मुंबई वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी वाहनांच्या वेगाची नवीन मर्यादा जाहीर केली आहे. वेगाची मर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांना ई - चलनामार्फत दंड भरावा लागू शकतो.

मुंबईत सुसाट गाडी चालवणं पडणार महाग, वेगाची नवीन मर्यादा जाहीर
SHARES

मुंबईत आता वेगाने गाडी चालवणं महाग पडणार आहे. प्रती तास ७० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने गाडी चालवल्यास तुम्हाला वाहतूक पोलिसांकडून ई -चलन येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना स्पीड लिमीट ओलांडल्यास दंड भरावा लागेल.  वाढती वाहतूक कोंडी आणि रॅश ड्रायव्हिंगमुळे वाहतुकीच्या नियमात बदल करण्यात आले आहे.

मुंबई वाहतूक पोलिसांनी शुक्रवारी वाहनांच्या वेगाची नवीन मर्यादा जाहीर केली आहे. मुंबईत आता वाहनांची वेग मर्यादा प्रती तास ७० किमी करण्यात आली आहे. वेगाची मर्यादा न पाळणाऱ्या वाहनचालकांना ई - चलनामार्फत दंड भरावा लागू शकतो. ९० टक्के मुंबईमध्ये सीसीटीव्ही बसवलेले आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना सीसीटीव्हीच्या दंडाची पावती वाहतूक पोलीस घरपोच पाठवणार आहेत. 

अशी आहे मुंबईत वेग मर्यादा

  • संपुर्ण मुंबईत प्रती तास ७० किमी वेग मर्यादा
  • मरीन ड्राईव्ह प्रती तास ६५ किमी
  • वरळी सी लिंक प्रती तास ८० किमी आणि वळणावर प्रती तास ३५ ते ४० किमी
  • पुर्व, पश्चिम, सायन पनवेल, एससीएलआर या चारही मार्गावर प्रती तास ७० किमी
  • जे जे उड्डाण पुल प्रती तास ६० किमी तर वळणावर प्रती तास ४० किमी वेग मर्यादा
  • इस्टर्न फ्री वे वर प्रती तास ८० किमी तर वळणावर ४० किमी
  • लालबाग उड्डाण पूल, जग्गनाथ शंकर शेठ उड्डाणपूल, नाना लाल मेहता उड्डाण पुल या तीनही उड्डाण पुलांवर वे प्रती तास ७० किमीहेही वाचा -

एसी लोकलमध्ये गारेगार प्रवासासह मनोरंजनाची सुविधा

मेट्रो-३ मार्गातील मिठी नदीखालील भुयारीकरण पूर्ण
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement