Advertisement

एसी लोकलमध्ये गारेगार प्रवासासह मनोरंजनाची सुविधा

चर्चगेट ते विरार या दीड तासांच्या एसी धावत्या लोकलमध्ये मुंबईकरांना लवकरच मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.

एसी लोकलमध्ये गारेगार प्रवासासह मनोरंजनाची सुविधा
SHARES

पश्चिम रेल्वे (Western Railway) मार्गावरील एसी लोकलला (AC Local) प्रवाशांचा फारसा प्रतिसाद मिळत नाही. एसी लोकलचं प्रवासी तिकीट (Ticket) सामान्या लोकलच्या तिकीट किंमतीपेक्षा जास्त असल्यानं प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. मात्र, आता प्रवाशांना एसी लोकलमध्ये गारेगार प्रवासासह मनोरंजनाची सुविधाही उपलब्ध होणार आहे. चर्चगेट ते विरार (Churchgate to Virar) या दीड तासांच्या एसी धावत्या लोकलमध्ये मुंबईकरांना लवकरच मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध होणार आहेत.

पश्चिम रेल्वेच्या एसी लोकलसह राजधानी (Rajdhani) आणि मध्य रेल्वेच्या (Central Railway) एसी सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये (Superfast Express) वाय-फाय (Wi-fi) कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ट्रेनमधील वायफायची जोडणी करून प्रवाशांना या सुविधेचा मोफत लाभ घेता येणार आहे. येत्या महिनाभरात मुंबईकरांसाठी ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

प्रवाशांना प्रवासदरम्यान मनोरंजन नसल्यानं कंटाळा येतो. त्यामुळं ही सुविधा सुरू करण्यात येत असून, मोफत वाय-फायमध्ये प्रसिद्ध चित्रपटांसह वाहिन्यांवरील दर्जेदार मालिका, संगीत-गाणे या पर्यायांचाही समावेश आहे. बहुभाषिक मनोरंजनाचे विविध कार्यक्रमही प्रवाशांना प्रवासात पाहता येणार आहे.

कंटेन्ट ऑन डिमांड (Content on Demand) या उपक्रमांतर्गत रेल्वेत प्रवाशांना मोफत वाय-फायच्या माध्यमातून मनोरंजनासाठी (Entertainment) विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लवकरच त्याची चाचणी प्रमुख गाड्यांमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.

पहिल्या टप्प्यात ४ ट्रेनमध्ये याची सुविधेची चाचणी घेण्यात येणार आहे. यात एसी लोकल, मुंबई सेंट्रल-दिल्ली राजधानी, ऑगस्ट क्रांती राजधानी आणि चेन्नई एक्स्प्रेस यांचा समावेश असणार आहे. पहिला टप्पा आगामी ४५ ते ६० दिवसांत पूर्ण होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात २५ टक्के आणि शेवटच्या टप्प्यात ५० टक्के गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

बफरमुक्त आणि उच्च दर्जाच्या व्हिडीओचा अनुभव मिळावा, यासाठी मेल-एक्स्प्रेसच्या २ डब्यांमध्ये एक आणि लोकलच्या ३ डब्यांमध्ये एक सर्व्हर कार्यान्वित केलं जाणार आहे. या सर्व्हरची जोडणी रेलटेलमधील मुख्य सर्व्हरला असणार आहे. प्रवाशांच्या मागणीचा आढावा घेत मनोरंजनाच्या पर्यायांत बदल करण्यात येणार आहे.

जुलै २०१९मध्ये रेल्वे मंत्रालयानं रेलटेल कंपनीला सर्व उपनगरीय लोकल-मेल एक्स्प्रेसमध्ये मोफत वाय-फाय पुरवण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानूसार निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. चार टप्प्यांत पूर्ण रेल्वेमध्ये मोफत वाय-फाय सेवा सुरू करण्यात येणार आहे.हेही वाचा -

मोटरमनच्या सतर्कतेमुळं टळली मोठी दुर्घटना

आरपीएफच्या खांद्यावर कॅमेरे, रेल्वेच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढRead this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा