Advertisement

मोनोरेलला वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड

मोनोरेलला डीसी वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत मुसळधार पावसामुळं बिघाड झाला आहे. त्यामुळं मोनोरेलचे संचलन बंद करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनानं घेतला आहे.

मोनोरेलला वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड
SHARES

मोनो रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एक महत्वाची बातमी आहे. मोनोरेलला डीसी वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत मुसळधार पावसामुळं बिघाड झाला आहे. त्यामुळं मोनोरेलचे संचलन बंद करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनानं घेतला आहे. मोनो रेल्वे वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेची क्षमता ३० ते ४० दिवस आहे. मात्र मुंबईत शनिवारी आणि रविवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळं या यंत्रणेची क्षमता १० ते १५ दिवसांवर आली आहे.

नव्या यंत्रणेसाठी उशिर

मोनो रेल्वे डीसी करंटवर धावत आहे. तसंच, या मोनो रेल्वेला सातत्यपूर्ण वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचं काम इंग्लंडस्थित ‘फेव्हेली ब्रेकनेल विलीस’ या कंपनीला दिलेलं आहे. दरम्यान, वीज पुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्यानं ही नवी यंत्रणा तयार होण्यासाठी सप्टेंबर महिना उजाडण्याची शक्यता आहे. त्यामुळं मोनो रेल्वेच्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरंं जाव लागण्याची शक्यता आहे

१० गाड्यांचं टेंडर

प्रवाशांच्या सेवेसाठी मोनो रेल्वेच्या ताफ्यात सध्यस्थितीत ५ गाड्या कार्यरत आहेत. मात्र, येत्या काळात आणखी २ गाड्या सुरू करण्यात येणार असून सप्टेंबर २०१९ पर्यंत ७ ट्रेन कार्यरत होणार आहेत. त्याशिवाय, एमएमआरडीएनं मोनो रेल्वेच्या ताफ्यात आणखी १० गाड्या दाखल करण्याचं टेंडर काढलं आहे. त्यामुळं २०२१ नंतर मोनोच्या ताफ्यात १७ ट्रेन येणार असल्यानं दर ६ मिनिटांनी एक मोनो रेल धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हेही वाचा -

मुंबईत पुढील ३६ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

सीएसएमटी-कसारा मार्गावरील लोकल सेवा सुरूRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा