Advertisement

मुंबईत पुढील ३६ तासांत मुसळधार पावसाची शक्यता

सोमवारी या मुसळधार पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र, असं असली तरी पुढील ३६ तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.

मुंबईत पुढील ३६ तासांत मुसळधार पावसाची शक्यता
SHARES

मुंबईसह उपनगरात शनिवारी आणि रविवारी मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसाच्या सरींवर सरी सुरु असल्यानं रस्ते वाहतुकीसह लोकल सेवाही ठप्प झाली होती. परंतु, सोमवारी या मुसळधार पावसानं विश्रांती घेतली आहे. मात्र, असं असली तरी पुढील ३६ तासांत आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे.

२४ तासांत २०४ मिमी पाऊस

मुंबईत मागील २४ तासांत २०४ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. ऑगस्टमधील गेल्या १० वर्षांतील २४ तासांमधील सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाचा पाऊस आहे. तसंच, मुंबई उपनगरांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे. रविवारी सकाळी ८.३० वाजता झालेल्या नोंदीनुसार आत्तापर्यंत २३७४.२ मिलीमीटर पाऊस सांताक्रूझ इथं नोंदविण्यात आला आहे. सांताक्रूझ इथं वार्षिक सरासरी २३५० मिलीमीटर असते.

ऑगस्ट महिन्याच्या अवघ्या ४ दिवसांमध्ये उपनगरांमध्ये ३९४.३ मिलीमीटर तर, कुलाबा येथे २२६.० मिलीमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. उपनगरांमधील ४ दिवसांमधील हा पाऊस सन २०१८, २०१५, २०१३, २०१२, २००९च्या संपूर्ण ऑगस्ट महिन्याच्या पावसापेक्षा अधिक आहे.

विलंब झाल्यास सुट 

पावसानं विश्रांती घेतली असली तरी, लोकल सेवा अद्याप विस्कळीतच आहे. त्यामुळं सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांना लेट मार्कचा सामना करावा लागणार आहे. तसंच, शाळा आणि कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. परंतु हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळं कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यास विलंब झाल्यास सुट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिवृष्टीचा इशारा

मागील २ झालेल्या मुसळधार पावसामुळं हवामान विभागानं पुढील अतिवृष्टीचा इशारा दिल्यानं सोमवारी मुंबईसह उपनगर, पालघर, ठाणे, रायगड, या जिल्ह्यातील शाळा व काॅलेजना सुट्टी देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. शासकीय कार्यालयात कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोहोचण्यास विलंब झाल्यास उशीरा येण्याची सवलत देण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या सोमवारी पीजीडीएफएम व पीजीडिओआरएम या अभ्यासक्रमाच्या पुनरपरिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहेत. तसंच, या पेपरच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर करण्यात येणार आहेत.

लोकलसेवा कोलमडली

मुंबईत पावसाच्या सरींवर सरी सुरु असल्यानं लोकलसेवा कोलमडली आहे. मुंबईतल्या मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. रुळांखालची खडी आणि माती वाहून गेली आहे. त्यामुळं लोकल वाहतूक उशिरानं सुरू आहे. मुंबईकडं येणाऱ्या अनेक एक्स्प्रेस मुंबईबाहेरच्या स्टेशन्सवर अडकल्या आहेत. जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्यानं अनेक एक्स्प्रेस रद्दही करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा -

टॅक्सीवाल्यांची मुजोरी थांबणार कधी?



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा