Advertisement

सीएसएमटी-कसारा मार्गावरील लोकल सेवा सुरू

सोमवारी सकाळपासून मध्य रेल्वेची सीएसएमटी ते कसारा मार्गावरील लोकल वाहतूक धीम्या गतीनं सुरू झाली. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

सीएसएमटी-कसारा मार्गावरील लोकल सेवा सुरू
SHARES

मुंबईत रविवारी झालेल्या मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेच्या लोकल वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला. या पावसामुळं सीएसएमटी ते कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली होती. तसंच, रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं लोकल कित्येक तास स्थानकात थांबून होत्या. त्यामुळं प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. परंतु, अखेर सोमवारी सकाळी सीएसएमटी ते कसारा मार्गावरील लोकल वाहतूक धीम्या गतीनं सुरू झाली. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

पावसाची विश्रांती

मुंबईसह उपनगरात आणि ठाणे शहरात रविवारी धुमशान घालणाऱ्या पावसानं रात्रीपासून विश्रांती घेतली आहे. त्यामुळं मध्य रेल्वेची कर्जत व कसारा मार्गावरील वाहतूक हळूहळू पुर्वपदावर येत आहे. तसंच, हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकही उशिरानं सुरू आहे.   ़

वाहतूक २ दिवस बंद 

कल्याण-कर्जत दरम्यानची सिग्नल यंत्रणा वाहून गेल्यामुळं या मार्गावरील वाहतूक २ दिवस बंद राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, सोमवारी सकाळी कल्याण ते अंबरनाथ लोकल सुरू झाल्यानं प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.हेही वाचा -

मुंबईत पुढील ३६ तासांत मुसळधार पावसाची शक्यतासंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा