Advertisement

मोनो रेल्वेच्या गाड्या सुस्थितीत रहण्यासाठी एमएमआरडीएनं मागवले सुटे भाग

मोनो रेल्वेला दिवसेंदिवस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं प्रवाशांची गैर सोय होऊ नये आणि मोनो रेल्वेच्या गाड्या सुस्थितीत रहाव्यात, बिघाड झाला तर वेळीच दूर करता यावा, यासाठी पुन्हा एकदा एमएमआरडीए सुटे भाग मागवणार आहे.

मोनो रेल्वेच्या गाड्या सुस्थितीत रहण्यासाठी एमएमआरडीएनं मागवले सुटे भाग
SHARES

मोनो रेल्वेला दिवसेंदिवस प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळं प्रवाशांची गैर सोय होऊ नये आणि मोनो रेल्वेच्या गाड्या सुस्थितीत रहाव्यात, बिघाड झाला तर वेळीच दूर करता यावा, यासाठी पुन्हा एकदा एमएमआरडीए सुटे भाग मागवणार आहे. याआधी काही महिन्यांपूर्वीही एमएमआरडीएनं मलेशियातून सुटे भाग मागवले होते. या भागांमुळं मोनो गाड्यांची डागडुजी, देखभाल करणं सहज शक्य होणार आहे.

प्रवासी संख्येतही वाढ

मोनोचा वडाळा ते सातरस्ता हा दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर सेवेवरचा ताण आणि प्रवासी संख्याही वाढ झाली आहेगाड्यांची अपुरी संख्या असल्याने दोन फेऱ्यांमध्ये २० ते २५ मिनिटांचे अंतर ठेवावे लागत आहेत्यामुळे प्रवासीसंख्या वाढूनही मोनोची कार्यक्षमता वाढलेली नाही.

१० गाड्यांचा ताफा

मोनोच्या ताफ्यात सध्या ६ गाड्या आहेत. एकूण १० गाड्यांचा ताफा होता. परंतु उर्वरित ४ गाड्या नादुरूस्त आहेतसध्यस्थितीत ताफ्यात असलेल्या काही गाड्यांचे सुटे भाग बदलण्यात आले होते. सुट्या भागांअभावी काही नादुरूस्त गाड्या यार्डात पडून होत्या. सुटे भाग आल्यानंतर या गाड्या सेवेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळं ६ गाड्या ताफ्यात आहेत.

गाड्यांची दुरुस्ती

दुसरा टप्पाही सुरू झाल्यानं गाड्या व्यवस्थित असाव्यात यासाठी एमएमआरडीएनं खबरदारी घेतली आहे. वेळीच गाड्यांची दुरुस्ती व्हावी यासाठी सुटे भाग मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मागच्यावेळी मलेशियातून सुटे भाग मागवण्यात आले होते. सध्या गाड्या अपुऱ्या असल्यानं एखाद्या गाडीत बिघाड झाल्यास वेळापत्रकावर परिणात होऊ शकतो.



हेही वाचा -

मालाड दुर्घटना: चौकशी समितीचा अहवाल १५ दिवसांत सादर होणार

वैद्यकीय पदवी प्रवेशाच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणीच्या मुदतीत वाढ



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा