Advertisement

मोनोच्या समस्यांमध्ये वाढ कायम, अद्याप तोडगा नाहीच


मोनोच्या समस्यांमध्ये वाढ कायम, अद्याप तोडगा नाहीच
SHARES

मुंबईत वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळं प्रवशांना प्रवासासाठी अधिक वेळ कर्च करावा लागतो. त्यामुळं प्रवाशांचा वेळ वाचावा व जलदगतीनं प्रवास करता यावा यासाठी प्रवाशांच्या सेवेत मेट्रो व मोनो रेल दाखल झाल्या. मुंबईत सुरूवातील सुरू झालेल्या मेट्रो रेल्वेला प्रवाशांनी चांगली पसंती दिली. त्यानंतर कालांतरानं मोनो रेलसुद्धा प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. चेंबूर ते वडाळा या पहिल्या आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेल सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) चालविण्यात येत आहे. या मोनो रेललाही प्रवाशांनी चांगली पसंती दिली. परंतु, आता प्रवाशांनी या मोनो रेलकडं पाठ फिरवली आहे.

चेंबूर ते वडाळा या पहिल्या आणि वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्यातील मोनोरेल सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) चालविण्यात येत आहे. तब्बल ३ हजार कोटी रुपये खर्च करत ही मोनो रेल सुरू करण्यात आली आहे. गारेगार आणि हार्बरवरून थेट पश्चिमेला प्रवास करता येतो. त्यामुळं प्रवाशांनी या मोनोच्या प्रवाशाला चांगलीच पसंती दिली. मात्र, सोयीसुविधा व सतत तांत्रिक अडथळे यामुळं मोनो रेलच्या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली आहे. तसंच, मोनोचा प्रवास म्हणजे वेळकाढू प्रवास असं शब्दांत प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

सुरू झाल्यापाून मोनोरेलमध्ये अद्याप विविध समस्या कायम आहेत. या समस्या सोडविण्यात एमएमआरडीएला अद्याप यश आलेले नाही. या समस्या एमएमआरडीएकडून कधी सोडविण्यात येणार, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

मोनो स्थानकांवर स्वच्छतागृहांचा अभाव, मोनोमध्ये वारंवार तांत्रिक बिघाड, वेळकाढू प्रवास, स्थानकाच्या पायऱ्यांवर बेघर- गर्दुल्यांच्या वावरामुळं प्रवासी हैराण, तब्बल २० ते २५ मिनिटांच्या अंतरानं मोनोच्या फेऱ्या, मार्गिकेच्या खाली अनधिकृत फेरीवाले आणि गाड्यांमुळं वाहतूककोंडी, अशा विविध समस्यांचा विळखा मोनोला असून, या समस्या दूर व्हाव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

सध्या दर २० ते २५ मिनिटांनी मोनो धावत असल्यानं प्रवाशांना मोनो स्थानकात तात्काळत वाट पाहावी लागते. मोनोचा वडाळा ते संत गाडगे महाराज चौक या दुसऱ्या टप्प्यावर मोनो सुरू झाल्यानं मोनोच्या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढली आहे. मात्र, हा प्रवास आणखी जलद करण्यासाठी मोनोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.

चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक अशा मोनोरेलच्या संंपूर्ण मार्गावर प्रवाशांना विविध समस्या भेडसावत आहेत. यामध्ये मोनोरेलच्या जिन्यांवर बेघर, गर्दुल्ल्यांचा वावर असल्याने प्रवाशांना असुरक्षित वाटते. यासह मोनो मार्गिकेच्या खाली आणि स्थानक परिसरामध्ये फेरीवाले आणि अनधिकृतपणे गाड्या पार्किंग केलेल्या असतात. त्यामुळं प्रशासनानं लक्ष घालावं, अशी सूचना प्रवाशी करत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा