Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

मोनोरेल पुन्हा ट्रॅकवर येणार, पण चेंबूर ते वडाळापर्यंतच


मोनोरेल पुन्हा ट्रॅकवर येणार, पण चेंबूर ते वडाळापर्यंतच
SHARES

गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेल्या मोनोरेलचा चेंबूर ते वडाळा तसेच चेंबूर ते जेकब सर्कल असा संपूर्ण टप्पा कधी सुरू होणार, याची प्रतीक्षा मुंबईकरांना लागून राहिली अाहे. पण मोनोरेल काही केल्या पुन्हा ट्रॅकवर येताना दिसत नाही. मोनोला तांत्रिक अडचणींचं ग्रहण लागल्यानं मोनोची प्रतिक्षा वाढतच चालली आहे. अशातच येत्या काही दिवसांत मोनोरेल पुन्हा ट्रॅकवर येणार, अशी जोरदार चर्चा आहे. ही चर्चा खरी असली तरी चेंबूर ते जेकब सर्कल असा पूर्ण मोनो मार्ग सुरू करण्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) यश अालेलं नाही. एमएमअारडीएनं मोनोचा पहिला टप्पाच अर्थात चेंबूर ते वडाळा हा मार्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त संजय खंदारे यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


महिनाभरात मोनो ट्रॅकवर

एमएमआरडीएनं चेंबूर ते वडाळा हा पहिला टप्पा सुरू करण्याच्या दृष्टीनं कामाला सुरूवात केली असून महिन्याभरात मोनो पुन्हा ट्रॅकवर येईल, अशी माहिती खंदारे यांनी दिली आहे. प्रवासीसंख्या रोडावल्याने तोट्यात असलेली अाणि दुसरा टप्पा सुरू करण्याच्या निर्णयामुळे अाधीच नुकसान सहन करत असलेली मोनोरेल अाग प्रकरणानंतर बंद पडली. पुढं नानाविध तांत्रिक अडचणी सुरू असल्यानं आठ महिन्यांनंतरही मोनो यार्डातच उभी आहे.


१५ डेडलाइन चुकवल्या

दरम्यान, एमएमआरडीएनं पहिला आणि दुसरा टप्पा एकाचवेळी सुरू करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेत त्यादृष्टीनंही प्रयत्न सुरू केले. पण प्रत्यक्षात मात्र ना पहिला टप्पा सुरू झाला ना दुसरा. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत एमएमआरडीएनं दुसऱ्या टप्प्याच्या १५ हून अधिक डेडलाईन चुकवल्या आहेत.


कंत्राटदार, गाड्यांची वानवा

दुसरा टप्पा पुढच्या काही महिन्यांत सुरू होण्याची सूतराम शक्यता नाही. कारण संपूर्ण मोनो मार्ग चालवण्यासाठी एमएमआरडीएला कंत्राटदारच मिळत नसल्याचं चित्र आहे. तर संपूर्ण मार्गावर मोनो सुरू करण्यासाठी पुरेशा मोनोरेल गाड्याही एमएमआरडीएकडे उपलब्ध नाहीत. त्यामुळं एमएमआरडीएच्या अडचणी वाढत असून मोनो रखडत आहे. परिणामी, एमएमआरडीएला कोट्यवधींचा फटका बसत आहे.


पहिला टप्पाच सुरू करणार

त्यामुळं आता एमएमआरडीएनं पहिला टप्पा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला टप्पा सुरू करण्याच्या दृष्टीनं चाचण्या आणि प्रक्रियांना वेग अाल्याची माहिती खंदारे यांनी दिली आहे. त्यानुसार लवकरच मोनो ट्रॅकवर येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. पण डेडलाईन देण्यास मात्र त्यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे.


हेही वाचा -

मोनोराणी पुन्हा ट्रॅकवर कधी? कुणालाच माहिती नाही

मोनोची साडेसाती संपेना, देखभालीसाठी कंत्राटदारच मिळेनाRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा