'परे'कडे आणखी एक 15 डब्यांची लोकल

 Pali Hill
'परे'कडे आणखी एक 15 डब्यांची लोकल
'परे'कडे आणखी एक 15 डब्यांची लोकल
'परे'कडे आणखी एक 15 डब्यांची लोकल
See all

मुंबई - येत्या सोमवारपासून म्हणजे 19 डिसेंबरपासून पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात 15 डब्यांची आणखी एक गाडी (रेक) दाखल होतेय. 12 डब्यांच्या एका गाडीचं रुपांतर या 15 डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात आलं आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या ताफ्यातल्या 15 डब्यांच्या गाड्यांची संख्या आता तीन होईल. 15 डब्यांच्या गाड्यांद्वारे सध्या 30 सेवा देण्यात येतायत, ती संख्या आता 42 होईल. या वाढीव फेऱ्या सुरू झाल्यावर गर्दीचा ताण कमी होण्यासही काही प्रमाणात मदत होईल. चर्चगेट-विरार आणि अंधेरी-विरार मार्गांवरील सेवांसाठी या गाड्या वापरण्यात येतील.

Loading Comments