Advertisement

बामनडोंगरी, खारकोपर स्थानकावर पहिल्या दिवशी ३,०७२ तिकटांची विक्री


बामनडोंगरी, खारकोपर स्थानकावर पहिल्या दिवशी ३,०७२ तिकटांची विक्री
SHARES

गेल्या रविवारी हार्बर मार्गावरील नेरूळ-उरण मार्गाचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनानंतर सोमवारपासून हा मार्ग प्रवाशांकरीता सुरू झाला. या मार्गाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी खारकोपर आणि बामनडोंगरी या स्थानकावर ३,०७२ तिकीटे विकण्यात आली.


प्रवाशांना फायदा

नेरूळ-उरण मार्गाचं काम जलदगतीने पूर्ण होत असून सद्यस्थितीत नेरूळ ते खारकोपर या स्थानकांदरम्यान नवी सेवा सुरू करण्यात आली आहे. या दोन स्थानकांदरम्यान राहणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा चांगला फायदा होत आहे.


चांगला महसूल

सोमवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत बामनडोंगरी स्थानकावर २,१३० तिकीटांची विक्री झाली. तर खारकोपर स्थानकावर ९४२ तिकीटांची विक्री झाली. या तिकीट विक्रीतून रेल्वेला ९० हजार रुपयांहून जास्त रुपयांचा महसूल मिळाल्याची माहिती वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिली.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा