Advertisement

भांडुप स्थानकात विशेष गाड्यांना थांबा द्यावा, मनोज कोटक यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी


भांडुप स्थानकात विशेष गाड्यांना थांबा द्यावा, मनोज कोटक यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
SHARES
मध्य रेल्वे मार्गावरील स्थानकत प्रवाशांची गर्दी दिवसेंदिवस प्रचंड वाढत चालली आहे. या मार्गावरील महत्वाच स्थानक दादर असून या स्थानकत प्रवाशांची गर्दी जास्त असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी परळ स्थानकातून लोकल फेऱ्या सोडण्यात येत आहेत. दरम्यान, दादर स्थानकातुन कोकणात जाणाऱ्या अनेक गाड्या सुटतात, मात्र या गाड्याना महत्वाच्या स्थानकातच थांबा दिला जातो. त्यामुळे इतर स्थानकातील कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या त्रासाला समोर जाव लागत. त्यामुळे दादर आणि ठाणे स्थानकातील गर्दी विभागण्यासाठी तसेच, भांडुप परिसरातील कोकणवासीयांना सोयीचे जावे म्हणून सुट्टी विशेष गाड्यांना भांडुप येथे थांबा देण्याची मागणी नव्याने करण्यात आली आहे.

रेल्वेमंत्र्यांना पत्र

खासदार मनोज कोटक यांनी याबाबत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले आहे. गणपती, होळी सणाच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची दादर आणि ठाणे स्थानकांत मोठी गर्दी होते. भांडुप परिसरात कोकणवासीयांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना दादर किंवा ठाणे स्थानकांत जाण्यासाठी सामानासह धावपळ करावी लागते. म्हणूनच गणपतीसह होळी आणि मे महिन्याच्या उन्हाळी सुट्टीत धावणाऱ्या सुटीविशेष गाड्या भांडुपला थांबवाव्यात, असे कोटक यांचे म्हणणे आहे.

प्रवाशांची संख्या अधिक

कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची संख्या अधिक वाढली असून, त्या तुलनेत अद्याप हव्या तशा सुधारणा या मार्गावर झालेल्या नाहीत, याकडेही कोटक यांनी रेल्वेमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे. 

कोकण रेल्वेच्या सुधारणेसाठी दीर्घकालीन आणि अल्पकालीन असे दोन्ही प्रकारचे उपाय करण्याची विनंतीही कोटक यांनी रेल्वेमंत्री गोयल यांना केली आहे.

  • कोकण रेल्वेमार्ग बऱ्यापैकी एकेरी मार्ग आहे. तो लवकरात लवकर दुहेरी करणासाठी प्रयत्न करावे.
  • उत्सव आणि उन्हाळी सुट्टीच्या काळात सुटीविशेष गाड्यांची संख्या वाढवली जावी.
  • कोकणात जाणाऱ्या गाड्यांचा फेरआढावा घेऊन दिवसभर वेगवेगळ्या वेळी गाड्या सोडण्यात याव्या.
  • राज्यराणी एक्स्प्रेसला १२ डबे आहेत. ते वाढवून कोकणकन्याप्रमाणे ही गाडी २३ डब्यांची करण्यात यावी.
  • राज्यराणी एक्स्प्रेसला प्राइम ट्रेनचा दर्जा द्यावा. सध्या सुटीविशेष गाड्यांप्रमाणे ही धावत असल्याने प्रवाशांना विलंब सहन करावा लागतो.
  • मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस २३ डब्यांची करावी.
  • नवीन प्रस्तावित डबल डेकर गाडी लवकरात लवकर सुरू करावी.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा