Advertisement

महिला प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वे करणार पुन्हा सर्वेक्षण

नोकरी करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढत असल्यानं महिला प्रवाशांच्या स्थिती जाणून घेण्याकरीता मुंबई रेल्वे विकास महामंडळानं पुन्हा एकदा महिला प्रवाशांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.

महिला प्रवाशांची वाढती संख्या पाहता रेल्वे करणार पुन्हा सर्वेक्षण
SHARES

मुंबईत रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या संख्येत पुरूष प्रवाशांप्रमाणं महिला प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळं नोकरी करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्या वाढत असल्यानं महिला प्रवाशांच्या स्थिती जाणून घेण्याकरीता मुंबई रेल्वे विकास महामंडळानं पुन्हा एकदा महिला प्रवाशांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं महिला प्रवाशांच्या सोयीसुविधेमध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे.


नव्यानं सर्वेक्षण

महिला प्रवाशांच्या संख्येबरोबरच त्यांच्या गरजा आणि अडचणी जाणून घेण्यासाठी नव्यानं सर्वेक्षण करण्याचा निर्णय मुंबई रेल्वे विकास महामंडळानं घेतला आहे. या सर्वेक्षणकरीता लवकरच टेंडर काढण्यात येणार असल्याचं समजतं आहे. रेल्वे विकास महामंडळानं यापूर्वी टिस्सच्या मदतीनं केलेल्या सर्वेक्षणानुसार २३ टक्के महिला प्रवासी तर ७७ टक्के पुरुष प्रवाशांची संख्या गृहीत धरण्यात आली होती.


२० टक्के जागा

उपनगरीय लोकलच्या प्रवासात सध्या महिलांना डब्यांच्या रचनेत साधारण २० टक्के जागा दिली जाते. त्याशिवाय, महिलांसाठी पुरेशी प्रसाधनगृहं नसल्यामुळं अनेक समस्यांना समोरं जावं लागतं आहे. महिला प्रवाशांसाठी सुरुवातील पश्चिम रेल्वेनं ५ मे १९९२ रोजी पहिली महिला स्पेशल लोकल सुरू केली. सध्यस्थितीत पश्चिम रेल्वे मार्गावर १० तर मध्य रेल्वे मार्गावर ४ महिला स्पेशल लोकल चालविण्यात येत आहेत.



हेही वाचा -

इडलीवाल्यानं वापरलं चटणीसाठी टॉयलेटचं पाणी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा