Advertisement

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, १६ जण गंभीर

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू, १६ जण गंभीर
SHARES

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, १६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर नवी मुंबईच्या कामोठे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. शिवाय, या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपघातग्रस्त एसटी बस ही मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या जुन्या मार्गावरून जात होती. त्यावेळी पनवेल एक्झिटजवळ हा भीषण अपघात झाला. बुधवारी मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. 

मिळालेल्या माहितीनुसार, एसटी ही साताऱ्यातून मुंबईच्या दिशेनं येत होती. त्यावेळी अचानक एका ट्रेलर किंवा ट्रक यासारख्या अवजड वाहनानं एसटीला जोरदार धडक दिली. या धडकेत बसच्या एका बाजूचा पत्रा पूर्णपणे कापला गेला आहे. त्यामुळं झोपेत असलेल्या प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, ही मृत व्यक्ती मुंबईतील बेस्ट चालक असल्याची माहिती समोर येत आहे. तर या अपघातात बस चालकासह १६ जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तात्काळ आयआरबी यत्रंणा, महामार्ग वाहतूक पोलीस पळस्पे टँप यांनी एमजीएम रुग्णालयात दाखल केलं आहे.


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा