Advertisement

पुण्यात MSRTCची वाहतूक सेवा पूर्वपदावर, 'इतके' कर्मचारी कामावर रुजू

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) पुणे विभागानं यासंदर्भात माहिती दिली आहे.

पुण्यात MSRTCची वाहतूक  सेवा पूर्वपदावर, 'इतके' कर्मचारी कामावर रुजू
SHARES

पुण्यामध्ये MSRTC ची वाहतूक  सेवा पूर्वपदावर आली आहे. पुणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एमएसआरटीसी) पुणे विभागानं गुरुवारी दावा केला की, एक महिन्याच्या कालावधीनंतर चालक आणि वाहक पुन्हा कामावर रुजू झाले आहेत.

किमान १,२०० कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. गुरुवारी, १३५ एसटी कार्यरत होत्या. तरीही खाजगी बसेस आणि कंत्राटदार-संचालित बसेस अद्याप विविध मार्गांवर कार्यरत आहेत.

९ डिसेंबर हा संपाचा ३०वा दिवस होता. आतापर्यंत संपावर गेलेल्या पुणे विभागातील किमान ५०० कामगारांना विभागानं निलंबित केले आहे. पुणे विभागातील बारामती, भोर, इंदापूर आणि ग्रामीण भागातील एसटी स्टँडमधून विविध मार्गांवर एसटी बसेस धावत आहेत.

पुण्याच्या स्वारगेट आणि शिवाजीनगर एसटी स्टँडवरून एसटी बस अद्याप सुरू झाल्या नाहीत. खासगी टुरिस्ट बसेस आणि कंत्राटदार संचालित शिवशाही आणि शिवनेरी बसेस इथून धावत आहेत.

“पुणे विभागातील बहुतेक एसटी बसचे कामकाज आज नियमित करण्यात आले आहे. कारण सुमारे १,२०० कामगार परत रुजू झाले आहेत. त्यापैकी ३०० चालक आणि वाहक आहेत. त्यामुळे आमच्या स्टँडवरून बस चालवणं आम्हाला सोपं झालं आहे. एकूण २२५ बस चालवण्यात आल्या ज्यात १३५ आमच्या सामान्य एसटी बसेस जिल्ह्याच्या आसपासच्या दुर्गम खेड्यांमध्ये जात होत्या. उर्वरित शिवशाही आणि शिवनेरी बस या खासगी कंत्राटदारांनी चालवल्या होत्या,” असं एमएसआरटीसी पुणे विभागीय नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी सांगितलं.

गेल्या एक महिन्यापासून, एमएसआरटीसी कामगार आणि संघटनांची एक कृती समिती यांना बस विभाग राज्य सरकारचा विभाग बनवायचा होता, म्हणून कामगारांनी (युनियन सदस्यांव्यतिरिक्त) पुणे विभागातील सर्व १३ डेपोवर उत्स्फूर्तपणे संप सुरू केला. राज्य सरकारला पाठिंबा देण्यासाठी खाजगी पर्यटन बस संघटना पुढे आली आणि राज्यभरात २,०० बसेस चालवल्या.

“आम्हाला आशा आहे की अधिकाधिक कामगार सामील होतील आणि आम्ही स्वारगेट आणि वाकडेवाडी एसटी स्टँड बस ऑपरेशन देखील सुरू करू शकू. जर या आठवड्यात आणखी कामगार सामील झाले. तर पुढील आठवड्यापासून हे स्टँड देखील कार्यान्वित होतील,” गायकवाड पुढे म्हणाले.

भोर तालुक्यातील प्रवाशी सखाराम गावडे म्हणाले, “आमचे गाव आतील भागात आहे आणि मला कामासाठी रोज पुण्याला यावे लागते. सध्या मी कामासाठी टेम्पोनं येतो. पण एसटी बस सुरू झाल्यास ते माझ्यासाठी सोयीचे होईल.हेही वाचा

आंतरराष्ट्रीय विमान सेवेचं टेक ऑफ लांबणीवर, 'या' दिवसापर्यंत स्थगिती

येत्या २ वर्षांत १० मोनो धावणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा