Advertisement

एसटीचा मोफत प्रवास अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राहणार कायम


एसटीचा मोफत प्रवास अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी राहणार कायम
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्यानं वाहतूक सेवा बंद होती. तसंच, वाहतूक सुविधा बंद असल्यानं एसटी महामंडळाच्या एसटीनं अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना वाहतूक सेवा दिली. ही सेवा मोफत असून, ही सेवा एसटी प्रवासाची मुभा आणखी काही दिवस कायम ठेवण्यात येणार आहे. उपनगरी रेल्वेसेवा नियमितपणे सुरू होत नाही, तोपर्यंत हा प्रवास बंद करु नये, अशी विनंती करण्यात आली आहे.

या सेवेपोटीची मुंबई पालिके कडून १४ कोटी रुपये रक्कम लवरकरच महामंडळाला देण्यात येणार आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारी कर्मचारी, पोलीस, पालिका कर्मचारी, शासकीय रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळ व बेस्ट उपक्रमाकडून विशेष बसगाड्या चालवण्यात आल्या. या बस कल्याण-डोंबिवली, पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, नालासोपारा, वसई,बदलापूर येथून मुंबईच्या दिशेने सोडण्यात आल्या.

बेस्टकडूनही अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सेवा दिली जात असतानाच ८ जूनपासून नियमितणे धावण्यास या सेवेला परवानगी मिळाली. अपुऱ्या बसगाड्यांमुळं प्रवाशांचे मात्र हाल झाले. त्यामुळे एसटीकडून जादा बसची सोय करतानाच बेस्टचा अत्यावश्यक सेवेचा प्रवासी आपल्याकडे वळता करण्याचा निर्णय घेतला.

१५ जूनपासून अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी लोकल सुरू झाल्याने बेस्टने आपली मोफत प्रवास सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. अत्यावश्यक सेवेपोटी मुंबई पालिके कडून न मिळालेली रक्कम व बेस्टनेही बंद के लेल्या सेवेमुळे एसटीकडूनही ही सेवा बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या.



हेही वाचा -


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा