Advertisement

एसटीच्या गाडीवर साडेनऊ हजारांची फवारणी

राज्यात कोरोनाबाधितांचा सरासरी दर ३.८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

एसटीच्या गाडीवर साडेनऊ हजारांची फवारणी
SHARES

राज्यात कोरोनाबाधितांचा सरासरी दर ३.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तिसऱ्या लाटेची भीती असल्यानं राज्य परिवहन (एसटी) महामंडळानं सर्व बसवर विशेष रसायनांची फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महामंडळ एका बसमागे तब्बल ९५०० रुपये मोजणार आहे. महामंडळाच्या ताफ्यात १७ हजारांहून अधिक बस आहेत. शिवाय ही फवारणी उपयोगाची ठरेल का असा सवाल उपस्थित होत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी यंत्रणेला सज्ज राहण्याच्या सूचना सरकारनं दिल्या आहेत. त्यानूसार, महामंडळानं अॅंटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग म्हणजे विषाणू मारण्यासाठी रसायनांची फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या सर्व प्रवासी बसमध्ये आतून तसेच बाहेरून ही फवारणी करण्यात येणार आहे. एकदा फवारणी केल्यास सहा महिन्यांसाठी त्याची वैधता असेल.

फवारणी केल्यानंतर ६ महिन्यांपर्यंत कोणत्याही प्रकारचा विषाणू तग धरू शकणार नाही. दुसऱ्या प्रकारच्या फवारणीची वैधता दोन महिन्यांसाठी असणार आहे. काही गाड्याांना वर्षातून दोनदा तर काही गाड्यांना वर्षातून ६ वेळ फवारणी करण्यात येईल. महामंडळातील जवळपास सर्वच बसला ही कोटिंग करण्यात येईल. यासाठी ९ ते साडेनऊ हजार रुपये प्रतिबस खर्च आहे.

संबंधित कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. येत्या आठवडाभरात फवारणी प्रक्रिया सुरू करण्यात येईल. महामंडळाच्या ताफ्यात १७ हजार गाड्या असून, सर्वच वाहनांवर फवारणी करण्यात येईल, असं यंत्र व अभियंता विभागाकडून सांगण्यात आलं. एसटी महामंडळातील बसमधून १०० टक्के प्रवासी वाहतुकीला मुभा सरकारनं दिलेली आहे. त्यानुसार राज्यात सर्वदूर गाड्या धावत आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा