Advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा शंभरावा दिवस; ९२ टक्के वाहतूक बंदच

गुरुवारी एसटी संपाचा शंभरावा दिवस असल्याने एसटीला पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा शंभरावा दिवस; ९२ टक्के वाहतूक बंदच
SHARES

राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी संपामुळे बंद आहे. आज, गुरुवारी एसटी संपाचा शंभरावा दिवस असल्याने एसटीला पर्यायी व्यवस्था काय, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा २७ ऑगस्टपासून संप कायम आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली. यावर निर्णय घेण्यासाठी उच्च न्यायालयाने मुख्य सचिवांसह त्रिसदस्यीय समिती स्थापन केली आहे. या समितीला दिलेली १२ आठवड्यांची मुदत गुरुवारी संपणार आहे.

या अहवालावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपला अभिप्राय देण्याच्या सूचना न्यायालयाच्या आहेत. यामुळे अहवालात विलीनीकरणाबाबत काय निर्णय होतो, याकडे एसटी कर्मचाऱ्यांसह राज्यातील जनतेचे लक्ष आहे. करोनापूर्व काळात राज्यात सुमारे लाखभर फेऱ्या एसटीच्या होत होत्या.

सध्या ८ ते साडेआठ हजार फेऱ्या होतात. यामुळे ९२ टक्के एसटी वाहतूक बंद आहे. संपकाळातील गेल्या १०० दिवसांत एसटी कर्मचारी आणि कुटुंबीय असे एकूण ८० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचा हा दुखवटा आहे.

जानेवारी अखेर महामंडळातील ९२,२६६ कर्मचाऱ्यांपैकी २७,१२७ संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. एकूण ६,१५६ कर्मचारी बडतर्फ झाले असून ११,०२४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.२५० आगरांपैकी २४३ आगार चालू झाले आहेत, असा दावा एसटी महामंडळाने केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा