Advertisement

एसटीची मुंबई ते पणजी बस सेवा

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

एसटीची मुंबई ते पणजी बस सेवा
SHARES

एसटीनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसांत मुंबईसह देशभरात सांताक्लॉजचं आगमन होणार आहे. दरवर्षी नाताळच्या दिवशी सांताकॉज सर्वांसाठी गिफ्टस् घेऊन येतो. यंदाही नाताळच्या पार्श्वभूमीवर एसटी बसच्या रुपात सांताक्लॉज आला असून, प्रवाशांसाठी त्यानं भेट वस्तू आणली आहे.

नाताळच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं मुंबई सेंट्रल ते पणजी अशी शयन आसनी बस सेवा ९ डिसेंबर पासून सुरु केली आहे. ही बस चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, म्हापसा मार्गे पणजीला जाणार आहे. ही बस मुंबई सेंट्रल येथून संध्याकाळी ४.३० वाजता तर पणजी येथून संध्याकाळी ४.०० वाजता सुटणार आहे.

या बसचं आगाऊ आरक्षण एसटी महामंडळाच्या msrtc.maharashtra.gov.in संकेतस्थळाबरोबरच एसटीच्या मोबाईल आरक्षण अ‍ॅपवरही उपलब्ध आहे. मुंबई सेन्ट्रल ते पणजीसाठी ९६५ रुपये तिकीट दर असून सावंतवाडीपर्यंत ८७५, कणकवलीसाठी ७८५ रुपये असल्याचं सांगण्यात आलं.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा