Advertisement

तिसऱ्या दिवशीही एसटीचा संप सुरूच, चर्चेच्या 13 फेऱ्या निष्फळ


तिसऱ्या दिवशीही एसटीचा संप सुरूच, चर्चेच्या 13 फेऱ्या निष्फळ
SHARES

परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि एसटी कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी उशीरा रात्रीपर्यंत चाललेल्या बैठकीत चर्चेच्या 13 फेऱ्या होऊनही पगारवाढीवर अंतिम तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप सलग तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे.

हेही वाचा - एसटी कर्मचाऱ्यांना पुढची २५ वर्षे ७ वा वेतन आयोग देणं अशक्य - रावते

बुधवारी सकाळी 10 वाजेपासून रात्री 1 वाजेपर्यंत परिवहन मंत्री दिवाकर रावते आणि एसटी कर्मचारी संघटना पदाधिकाऱ्यांमध्ये एकूण 7 बैठका झाल्या. त्यात रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 35 टक्क्यांपर्यंत पगारवाढ देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या पगारात 4 ते 7 हजार रुपयांची वाढ होऊ शकते. 2012 ते 2016 या करारानुसार कर्मचाऱ्यांना 13 टक्क्यांपर्यंत पगारवाढ देता येऊ शकते.

मात्र, संघटना पदाधिकारी 7 व्या वेतन आयोगाच्या मागणीवर ठाम राहिल्याने या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. त्यामुळे आता जोपर्यंत संघटना संप मागे घेत नाही, तोपर्यंत पुढील बोलणी करणार नाही, अशी भूमिका रावते यांनी घेतली आहे.



हेही वाचा -

एसटीची खेळी.. बुधवारी संप न मिटल्यास कंत्राटी कामगारांची नियुक्ती

'एक उपाशी, तर दुसरा खातो तुपाशी', एसटी संपाचा फायदा घेत खासगी वाहनांची दरवाढ

एसटी कर्मचाऱ्यांना पुढची २५ वर्षे ७ वा वेतन आयोग देणं अशक्य - रावते

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा