Advertisement

1 जूनपासून एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ धावणार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवरकच पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहे.

1 जूनपासून एसटीची पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ धावणार
SHARES

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवरकच पर्यावरणपूरक अशी इलेक्ट्रिक बस (Electric Bus) दाखल होणार आहे. 1 जून 2022 रोजी अमृतमहोत्सवी वर्षात एसटी पदार्पण करणार आहे.

या दिनाचे औचित्य साधत एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या पहिल्या ‘शिवाई’ या इलेक्ट्रिक बसचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे.

‘शिवाई’ची वैशिष्ट्ये

  • बसची लांबी 12 मीटर
  • टू बाय टू आसन व्यवस्था
  • एकूण 43 आसने
  • ध्वनी व प्रदुषणविरहीत तसेच वातानुकूलीत गाडी
  • गाडी ताशी 80 किमी वेगाने धावणार
  • बॅटरी क्षमता 322 के.व्ही.

पुण्यात बुधवारी, 1 जून रोजी होणाऱ्या लोकार्पण सोहोळ्यानंतर ही पहिली बस पुणे ते अहमदनगर मार्गावर धावणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब (Anil Parab) यांनी आज दिली.

अहमदनगर येथूनही शिवाई बस सुटणार आहे. ही बस पुण्यापर्यंत धावेल. 1 जून 1948 रोजी अहमदनगर येथून धावलेल्या पहिल्या बसचे वाहक लक्ष्मणराव केवटे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे, असेही परब यांनी सांगितले.

दिवसेंदिवस इंधनाचे वाढते दर, वाहनांमुळे वाढणारे प्रदुषण रोखण्यासाठी तसेच प्रवाशांना चांगली वाहतूक सेवा उपलब्ध करून देण्याच्या हेतूने एसटीच्या ताफ्यात विद्युत प्रणालीवर धावणारी इलेक्ट्रिक बस दाखल करण्याचा निर्णय घेतला, असे मंत्री, ॲड. परब यांनी सांगितले.

लोकार्पण केल्यानंतर ‘शिवाई’च्या पुणे – अहमदनगर – पुणे मार्गावर दिवसाला 6 फेऱ्या होणार आहेत. यानंतर टप्प्याटप्याने इलेक्ट्रिक बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असे सांगतानाच आकर्षक रंगसंगती तसेच किफायतशीर व आरामदायी प्रवासामुळे ही बस प्रवाशांच्या नक्कीच पसंतीस उतरेल, असा विश्वासही परब यांनी व्यक्त केला आहे.



हेही वाचा

कोकणातील ‘हे’ दोन टोल १ जूनपासून सुरू, मोजावे लागणार अधिक पैसे

मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही, २ कोटी ८० लाखांचा खर्च

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा