Advertisement

कोकणातील ‘हे’ दोन टोल आजपासून सुरू, मोजावे लागणार अधिक पैसे

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना या मार्गावरुन प्रवास करताना पैसे मोजावे लागणार आहेत.

कोकणातील ‘हे’ दोन टोल आजपासून सुरू, मोजावे लागणार अधिक पैसे
SHARES

मुंबई-गोवा महामार्गावरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Mumbai Goa Highway Toll) विवादीत ओसरगाव टोलनाका (Osargaon Toll) अखेर 1 जून (उद्या) पासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांना या मार्गावरुन प्रवास करताना पैसे मोजावे लागणार आहेत.

या टोल वसुलीचं कंत्राट एमटी करीमुनिसा कंपनीकडे देण्यात आलंय. ओसरगावसोबत राजापूर-हातीवले (Rajapur Toll) मधील टोलही उद्यापासून सुरू होणार आहे.

मुंबई गोवा हायवेच्या चौपदरीकरणाचं काम गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गावरील बहुतांश काम पूर्ण झालं असून मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास आता अधिक वेगवान होणार आहे.

टोल नाक्यापासून वीस किलोमीटरच्या परिघात येणाऱ्या वाहनांना मासिक 315 रुपयांचा पास देण्यात येणार आहे. तर इतर वाहनांना मात्र टोल भरावा लागणार आहे.

बाईक, स्कूटी आणि रिक्षा यांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कोकणातील रिक्षा चालकांना या टोल वसुलीतून दिलासा मिळालाय. दुसरीकडे फास्ट टॅग असलेल्या वाहनांना टोलची पन्नास टक्के रक्कम भरावी लागेल.

असा असेल टोलचा दर

जीप, व्हॅन, कार – सिंगल जर्नी 90 रुपये
रिर्टन जर्नी टोल घेतल्यास 135 रुपये दर

हलकी व्यावसायिक वाहनं, मोठी मालवाहू वाहनं आणि मिनीबससाठी 135 रुपये
रिटर्न जर्नीसाठी 220 रुपये

ट्रक आणि बससाठी (डबल अँक्सल) – 305 रुपये
रिटर्न जर्नीसाठी 460 रुपये

ट्रक आणि बस (ट्रिपल अँक्सल) – 335 रुपये
रिटर्न जर्नीसाठी – 500 रुपये

MH 07 पासिंग वाहनांसाठी 45 रुपये टोल
MH 07 पासिंग मिनीबससाठी 75 रुपये
MH 07 पासिंग ट्रक-बससाठी 115 रुपये



हेही वाचा

मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही, २ कोटी ८० लाखांचा खर्च

पावसाळ्यानंतर वॉटर टॅक्सी सेवा गेटवे ऑफ इंडियापासून सुरू होणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा