Advertisement

पावसाळ्यानंतर वॉटर टॅक्सी सेवा गेटवे ऑफ इंडियापासून सुरू होणार

मुंबई-नवी मुंबई वॉटर टॅक्सी सेवा दक्षिण मुंबईतील फेरी व्हार्फ माझगाव येथील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल (DCT) आणि नव्याने उद्घाटन झालेल्या बेलापूर जेटीच्या दरम्यान कार्यरत आहे.

पावसाळ्यानंतर वॉटर टॅक्सी सेवा गेटवे ऑफ इंडियापासून सुरू होणार
(File Image)
SHARES

मुंबई आणि नवी मुंबई दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा फेब्रुवारीत सुरू झाली. आता ही सेवा गेटवे ऑफ इंडियापर्यंत वाढवण्यात आली आहे. पण पावसाळ्यानंतरच ही सेवा गेट वे ऑफ इंडियापासूनही सुरू होणार आहे.

आत्तापर्यंत, मुंबई-नवी मुंबई वॉटर टॅक्सी सेवा दक्षिण मुंबईतील फेरी व्हार्फ माझगाव येथील डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल (DCT) आणि नव्याने उद्घाटन झालेल्या बेलापूर जेटीच्या दरम्यान कार्यरत आहे.

महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने (MMB) मुंबई पोर्ट ट्रस्टला (MbPT) गेटवेवर देखील ही सेवा पुरवण्याची विनंती केली होती, जेणेकरून अधिक संख्येने प्रवासी या सेवेचा लाभ घेऊ शकतील.

या वर्षी फेब्रुवारीमध्ये पुन्हा सुरू झालेल्या मुंबई ते नवी मुंबई दरम्यानची वॉटर टॅक्सी सेवाही पावसाळ्यानंतर गेट वे ऑफ इंडियावर थांबणार आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, पावसाळ्यानंतर सेवा पुन्हा सुरू झाल्यावर, सप्टेंबरच्या आसपास, प्रवासी गेटवे ऑफ इंडिया येथे वॉटर टॅक्सीनं प्रवास करू शकतात.

वृत्तानुसार, पावसाळा अवघ्या काही दिवसांवर आल्याने मुंबई ते नवी मुंबई दरम्यानची वॉटर टॅक्सी सेवा बुधवार, २५ मेपासून बंद करण्यात आली होती.

अहवालानुसार, डीसीटी-बेलापूर वॉटर टॅक्सीला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. तथापि, बेलापूर-एलिफंटा मार्गाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि 320 फेऱ्या आणि 3,299 प्रवासी पूर्ण झाले, असे एका खाजगी ऑपरेटरने सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय जहाज वाहतूक मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी 17 फेब्रुवारी रोजी वॉटर टॅक्सी सेवेची घोषणा केली. मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानच्या प्रवासाची वेळ कमी करण्यासाठी या सेवेची योजना करण्यात आली होती.



हेही वाचा

दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेटसक्ती, नाहीतर...

बेस्टच्या ताफ्यात 2100 इलेक्ट्रिक बसेस होणार दाखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा