Advertisement

मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही, २ कोटी ८० लाखांचा खर्च

मोटरमन केबिनमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

मोटरमन केबिनमध्ये सीसीटीव्ही, २ कोटी ८० लाखांचा खर्च
SHARES

मोटरमन केबिनमध्ये लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यासाठी पश्चिम रेल्वेकडून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यासाठी एका कंपनीला कॅमेरे बसवण्याचे कामही दिले आहे. येत्या एक ते दीड महिन्यात हे काम सुरू होणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने कॅमेरे बसवण्याच्या प्रकल्पाला अगोदरच मंजुरी दिली आहे. लोकलचे मोटरमन आणि गार्डवर नजर ठेवतानाच अपघात घडल्यास त्याच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.

लोकल चालवताना मोटरमनकडून चुकाही होतात. त्यामुळे अपघातांचा धोका संभवतो. एखाद्या स्थानकात थांबा विसरणे, वेगमर्यादेचे उल्लंघन करणे, लाल सिग्नल असतानाही लोकल काहीशी पुढे नेणे अशा घटना घडतात. त्याचे प्रमाण कमी असले तरी त्यामुळे अपघात होऊ शकतो. त्यामुळेच अशा घटनांमागील कारणांचा शोध घेता यावा, रेल्वे प्रशासनाकडेही पुरावे उपलब्ध व्हावे, तसेच ती होत असल्यास त्वरित नियंत्रण कक्षाच्या निदर्शनास आणता यावी, यासाठी खबरदारी म्हणून लोकलमधील मोटरमन आणि गार्ड केबिनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहेत.

दोन महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रियाही राबवण्यात येत होती. यासंदर्भात पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी सांगितले की, हे काम एका कंपनीला देण्यात आले आहे. यासाठी २ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.



हेही वाचा

पावसाळ्यानंतर वॉटर टॅक्सी सेवा गेटवे ऑफ इंडियापासून सुरू होणार

बेस्टच्या चलो अॅपद्वारे वीज बिल भरा ऑनलाइन

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा