Advertisement

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई बीएमसीने थांबवला, कारण...

सोमवारपासून काम बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई बीएमसीने थांबवला, कारण...
SHARES

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले आहे. पालिकेच्या एच पूर्व वॉर्डकडून या प्रकल्पाला काम बंदची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानुसार सोमवारपासून काम बंद करण्यात आल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली.

मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेकडून आखण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीचे पालन करणे बांधकाम, विकासकामांठिकाणी बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) येथे होणाऱ्या मुंबई-अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पात या नियमावलीकडे पाठ दाखवली जात होती. त्यामुळे नोटीस बजावण्यात आली आहे. 

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात बुलेट ट्रेनचे सुरुवातीचे स्थानक वांद्रे-कुर्ला संकुल असल्याने येथे भुयारी स्थानक निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र इथे पालिकेने प्रदूषण नियंत्रणासाठी लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी केली जात नव्हती.

प्रकल्पाच्या ठिकाणी पालिकेच्या सहआयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानुसार बुलेट ट्रेन प्रकल्प प्रशासनाला मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या जात होत्या. मात्र या सूचनांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते.

गेल्या आठवड्यातही पालिकेच्या वॉर्ड स्तरावरील पथकांकडून पाहणी करण्यात आली. त्यावेळीही नियमावलीकडे दुर्लक्ष होत असल्याचे आढळून आल्याने पालिकेकडून 'काम बंद'ची नोटीस बजावण्यात आली.



हेही वाचा

मुंबईतील 'या' रस्त्यांवर स्पीड लिमिट लागू

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा