Advertisement

परदेशातून येणाऱ्यांसाठी मुंबई विमानतळावर वेगळा कॉरिडॉर

हायरिस्क देशातून आलेली सर्व विमानं टर्मिनलच्या पूर्वेला उतरवण्यात येतील.

परदेशातून येणाऱ्यांसाठी मुंबई विमानतळावर वेगळा कॉरिडॉर
SHARES

परदेशातून आलेल्या प्रवाशांना आणि त्यांच्याशी संपर्कात आलेल्या लोकांना ओमिक्रॉनची लागण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हायरिस्क देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई विमानतळावर वेगळा कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे.

हायरिस्क देशातून आलेली सर्व विमानं टर्मिनलच्या पूर्वेला उतरवण्यात येतील. प्रवाशानं विमानतळावर प्रवेश करताच थर्मल स्कॅनरमधून तापमान मोजलं जाईल. त्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करण्यासाठी १०० रजिस्ट्रेशन काऊंटर तयार करण्यात आले आहेत.

प्रवाशांना कोरोना चाचणीसाठी ताटकळत राहावे लागू नये म्हणून ६८ सॅम्पल कलेक्शन बुथ तयार करण्यात आले आहेत. आरटीपीसीआर आणि रॅपीड पीसीआर हे दोन पर्याय प्रवाशांकडे असतील. सॅम्पल कलेक्शननंतर प्रवाशी इमिग्रेशन प्रक्रिया पार पाडू शकतो.

दरम्यान, प्रवाशाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यास त्याला १४ दिवस संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येईल. तर रिपोर्ट निगेटीव्ह आल्यास ७ दिवस होम क्वारंटाईन केलं जाईल. ७ दिवसानंतर या प्रवाशाची पुन्हा तपासणी केली जाणार आहे.

दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गवरून २५ नोव्हेंबर २०२१ रोजी मुंबईत आलेल्या ३७ वर्षीय पुरुषाला ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचं सिध्द झालं आहे. या रुग्णासोबत राहिलेल्या आणि २५ नोव्हेंबरला अमेरिकेहून आलेल्या त्याच्या ३६ वर्षीय मैत्रिणीला देखील या विषाणूची बाधा झाल्याचं प्रयोगशाळा अहवालातून समोर आलं आहे.

या दोघांना कोणतीही लक्षणे नाहीत. हे दोन्ही रुग्ण सेव्हन हिल्स रुग्णालयात भरती आहेत. या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. या दोन्ही रुग्णांच्या ५ अतिजोखमीच्या आणि १५ कमी जोखमीच्या निकटवर्तीयांचा शोध घेण्यात आलेला आहे. पुढील तपास सुरु आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.



हेही वाचा

ओमिक्रॉनचा धोका 'असा' टाळता येईल, आफ्रिकेतील डॉक्टरांची महत्त्वपूर्ण माहिती

परदेशातून मुंबईत आलेले १०० पेक्षा अधिक प्रवासी गायब

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा