Advertisement

जेटला १४ हजार कोटींची आॅफर

आर्थिक गाळात गेलेल्या जेट एअरवेजचे मालकी हक्क ताब्यात घेण्यासाठी डार्विन प्लॅटफाॅर्म या ग्रुपने १४ हजार कोटी रुपयांची आॅफर स्टेट बँकेला दिली आहे.

जेटला १४ हजार कोटींची आॅफर
SHARES

आर्थिक गाळात गेलेल्या जेट एअरवेजचे मालकी हक्क ताब्यात घेण्यासाठी डार्विन प्लॅटफाॅर्म या ग्रुपने १४ हजार कोटी रुपयांची आॅफर स्टेट बँकेला दिली आहे. बँकेसोबत बुधवारी झालेल्या चर्चेत ही आॅफर दिल्याची माहिती डार्विनचे सीईओ राहुल गणपुले यांनी दिली. 

कर्मचारी न्यायाच्या प्रतिक्षेत

जेटची सेवा १७ एप्रिलपासून बंद आहे. परिणामी जेटमध्येे काम करणाऱ्या २२ हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली आहे. मागील ३ महिन्यांपासून जेटच्या कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही. अनेकदा आंदोलन करूनही कर्मचाऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाही. जेटचे सीईओ आणि डेप्युटी सीईओने लागोपाठ राजीनामा दिल्यानंतर बुधवारी जेटचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरले. तसंच जेटचा हक्क विकण्यासंदर्भातील १० मेचा कालावधीही निघून गेल्याने कर्मचारी गोंधळात सापडले आहेत. 

हक्क विकणार?

त्यातच कंपनीची आर्थिक बाजू सांभाळणाऱ्या स्टेट बँक आणि डार्विन प्लॅटफाॅर्ममध्ये जेटचा हिस्सा विकण्यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीत डार्विनने जेटचे हक्क विकत घेण्यासाठी स्टेट बँकेला १४ हजार कोटी रुपयांची आॅफर दिली. या आॅफरवर बँक काय निर्णय घेते, यावर पुढील प्रक्रिया अवलंबून आहे. 

डार्विनची तेल, गॅस, आदरातिथ्य आणि बांधकाम क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे.



हेही वाचा-

पगार द्या, तेव्हाच हटू, जेट एअरवेजच्या कार्यालयाबाहेर कर्मचाऱ्यांचा ठिय्या

नाहीतर, मुंबई विमानतळ बंद करू, भारतीय कामगार सेनेचा इशारा



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा