Advertisement

मुंबईकरांच्या सेवेत अडीच हजार एसी बस लवकरच दाखल होणार

सिंगल आणि डबल डेकर नॉन एसी बसची जागा आता एसी बस गाड्यांनी घेतली.

मुंबईकरांच्या सेवेत अडीच हजार एसी बस लवकरच दाखल होणार
Representative image
SHARES

मुंबईत गेली अनेक वर्षे बेस्ट उपक्रमाकडून अविरतपणे बेस्ट सेवा दिली जात आहे. सिंगल आणि डबल डेकर नॉन एसी बसची जागा आता एसी बस गाड्यांनी घेतली.

प्रवाशांच्या पसंतीस असलेली नॉन एसी डबल डेकर बस कालबाह्य झाल्यानंतर विद्युतवर धावणाऱ्या ई-डबल डेकर बस प्रवाशांसाठी धावू लागल्या आहेत. या सेवा अधिकाधिक प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून ताफा वाढवण्याचा आणि काही नव्या मार्गांवर या गाड्या सोडण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

वर्षभरापूर्वी प्रवाशांच्या सेवेत आलेल्या डबल डेकर ई-बसची संख्या सध्या 50 आहे. यापैकी 30 डबल डेकर बस कमर्शियल हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फोर्ट, नरिमन पॉईंट, कफ परेड या भागांतून धावत आहेत. सध्या बेस्टच्या ताफ्यातील सर्व डबल डेकर बस भाडेतत्त्वावर असून येत्या काही महिन्यांत त्यांची संख्या वाढवण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.

बेस्ट उपक्रमाकडून एसी डबल डेकरचा ताफा वाढवण्यावर भर दिला जात आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी एप्रिल-मे महिन्यापर्यंत आणखी 200 डबल डेकर बस दाखल करण्याचे उद्दिष्ट आहे.

बेस्ट उपक्रमाने डबल डेकर बससाठी काही नवीन मार्गाचीही निवड केली आहे. यात मार्गिका क्रमांक 123चा समावेश आहे. जे यापूर्वी आरसीएस चर्चेत ताडदेव व तेथून मरीन ड्राईव्हपर्यंत होती. तसेच विलेपार्ले ते जुहू,चर्चगेट ते नरिमन पॉईंट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गेट वे ऑफ इंडिया असे अन्य मार्गिका प्रस्तावित आहेत.

- मुंबई शहरातील फोर्ट, नरिमन पॉईंट, कफ परेड भागात 30 डबल डेकर एसी बस धावत आहेत.
- 20 डबल डेकर बस उपनगरात कुर्ला डेपो ते वांद्रे कुर्ला संकुल, कुर्ला ते अंधेरी,अंधेरी पूर्व स्थानक ते सिप्झमध्येही उपलब्ध.हेही वाचा

मुंबईतल्या 'या' 20 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार

भायखळा, क्रॉफर्ड, फोर्ट आणि गेटवेला मुंबई मेट्रो 11 ने जोडणार

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा