Advertisement

दादर स्टेशनवरील 10-11 प्लॅटफॉर्मवरून दोन्ही बाजूने चढता उतरता येणार

दादर स्टेशनवर डबल डिस्चार्जची सुविधा सुरू केल्यानंतर स्टेशनची गर्दी कमी झाली आहे

दादर स्टेशनवरील 10-11 प्लॅटफॉर्मवरून दोन्ही बाजूने चढता उतरता येणार
SHARES

मध्य रेल्वेवरील (CR) दादर स्थानकातील गर्दी  लवकरच कमी होणार आहे. जलद लोकल आणि एक्सप्रेस येणाऱ्या प्लॅटफॉर्मवर आता दोन्ही बाजूंनी चढता-उतरता येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्लॅटफॉर्मचे काम सुरू होते. 

डबल-डिस्चार्ज प्लॅटफॉर्म (दोन्ही बाजूंनी चढणे- उतरणे) 10/11 आता तयार आहे आणि प्रवाशांनी त्याचा वापर सुरू केला आहे, त्यामुळे स्थानकावरील गर्दी कमी झाली आहे.

मध्य रेल्वेचे मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) रजनीश गोयल यांनी केवळ प्लॅटफॉर्म रुंद करण्याचे आश्वासन दिले नाही तर ते तयार केले. तसेच प्रवाशांना अडथळे निर्माण करणारे स्टॉल देखील हटवण्यात आले आहेत. 

स्थानकातील गर्दी कमी करण्याच्या योजनेअंतर्गत, धीम्या मार्गावरील प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आधीच करण्यात आले आहे आणि आता दादर येथील जलद ट्रेन प्लॅटफॉर्म 10/11 चे दुहेरी डिस्चार्जमध्ये रूपांतर करण्यात आले आहे.

"प्लॅटफॉर्मला एका बाजूने कुंपण करण्यात आले होते आणि त्याचा वापर कमी होता. आता बॅरिकेड्स आणि अडथळे हटवल्यानंतर, प्लॅटफॉर्म वापरण्यायोग्य झाला आहे. आता आम्ही दादर लोकलमध्ये सहज चढू शकतो," असे अविनाश बुरुंडे या प्रवाशाने मिड डेला सांगितले.

"प्लॅटफॉर्म 10 वरील सर्व स्टॉल हटवणे हे योग्य दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. प्लॅटफॉर्मवर नेहमीच गर्दी असते," राकेश रंजन नावाचे दुसरे प्रवासी म्हणाले.

प्लॅटफॉर्म 10/11 चा वापर जलद लोकल ट्रेन आणि मेल/एक्स्प्रेस या दोन्ही गाड्यांद्वारे केला जातो. ज्यामुळे प्लॅटफॉर्म 10 वर गर्दी होत असे. कारण सामानासह प्रवासी प्लॅटफॉर्मवर थांबायचे. स्टॉल हटवणे आणि आता प्लॅटफॉर्म 11 वरून प्लॅटफॉर्म 10 वर प्रवेश केल्याने गर्दी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा