Advertisement

मुंबई एअरपोर्टच्या नावात सुधारणा, 'महाराज' उपाधीचा समावेश

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' असं झालं आहे. यासंदर्भात नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

मुंबई एअरपोर्टच्या नावात सुधारणा, 'महाराज' उपाधीचा समावेश
SHARES

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात सुधारणा करत 'महाराज' या उपाधीचा समावेश करण्यात आला आहे. या बदलामुळे आता या विमानतळाचं नाव 'छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' असं झालं आहे. यासंदर्भात नागरी हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.


'महाराज' शब्दाचा समावेश

विमानतळाच्या नावात सुधारणा करण्याची राज्यातील जनतेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर मान्य झाली आहे. अखेर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात महाराज शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यापूर्वी छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून ओळखला जाणारा विमानतळ यापुढे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाने ओळखला जाईल.


मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

मुंबई विमानतळाच्या नावात महाराज या उपाधीचा समावेश केल्याने महाराजांचा सन्मान वाढला आहे. असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांचे आभार मानले आहेत.


सुरेश प्रभूंनी केलं ट्वीट

बऱ्याच वर्षांपासूनची मागणी मान्य झाल्याबद्दल राज्यातील जनतेचे अभिनंदन. राज्यातील जनतेच्या भावना लक्षात घेतल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही आभार मानतो, असे सुरेश प्रभू यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


हेही वाचा -

'आंतराष्ट्रीय विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नाव द्या', शिवसेनेची मागणी

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा