Advertisement

'आंतराष्ट्रीय विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नाव द्या', शिवसेनेची मागणी

सहार येथील विमानतळाचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने विमानतळावर धडक मोर्चा काढला.

'आंतराष्ट्रीय विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नाव द्या', शिवसेनेची मागणी
SHARES

मुंबईतल्या सहार येथील विमानतळाचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेने विमानतळावर धडक मोर्चा काढला. शिवसेना आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात हा विराट मोर्चा काढण्यात आला. मागील चार वर्षांपासून ही मागणी करत असून आता जर ही मागणी मान्य झाली नाही तर विमानतळ बंद पाडू, असा इशारा इशारा देखील आंदोलनकांनी दिला आहे.


महाराज उल्लेख हवा


या विमानतळाचं ‘छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असं नावं आहे. मात्र हा महाराजांचा अपमान असून विमानतळाला ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असं नाव देण्यात यावे. ही मागणी शिवसेना गेल्या चार वर्षांपासून करत आहे. विमानतळासमोर छत्रपतींचा पुतळा उभा आहे त्यावर लक्ष ठेवण्यात यावं.


विमानतळाचं कंत्राट देण्यात आलेली जीवीके (GVK) कंपनीला महाराजांबद्दल आदर नसल्यानं वारंवार छत्रपतींचा अपमान करत आहे. महराजांचा आणखी अपमान शिवसेना सहन करणार नाही. जर मागण्या मान्य न झाल्यास विमानतळ बंद पाडू.
- अनिल परब, शिवसेना नेते

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणासाठी वॉच डॉग फाऊंडेशननं गांधीगिरीच्या माध्यमातून आंदोलन सुरू केलं. या विमानतळावर आणि विमानात केल्या जाणाऱ्या उद्घोषणांमध्येदेखील महाराज या उपाधीचा उल्लेख केला जात नाही. त्यामुळे वॉच डॉग फाऊंडेशननं हे आंदोलन सुरू केलं. शिवाय विमानतळाजवळील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नामकरण केलेला 20 फुटांचा मोठा बॅनर वॉच डॉग फाऊंडेशननं लावलाय.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा