मुंबई (mumbai) रेल्वे विकास महामंडळाकडून (mrvc) बांधण्यात येणाऱ्या 12 आणि 15 डब्यांच्या एसी लोकलमधील मालडबेही वातानुकूलित असणार आहेत.
सर्व उपनगरी रेल्वे वातानुकूलित (AC) झाल्यानंतर मालडब्याचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मुंबईतील उपनगरी रेल्वेतील मुख्य घटक असलेल्या मालवाहू श्रमिकांना सुखद धक्का मिळणार आहे.
या डब्यांतील वस्तूंचा वास अन्य डब्यात पसरू नये, यासाठी स्वतंत्र डबा आणि स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा अशी व्यवस्था असणार आहे.
मुंबई लोकलच्या (mumbai local) आधुनिकीकरणासाठी 'एमआरव्हीसी'ने दोन हजार 856 पूर्ण वातानुकूलित वंदे मेट्रो डब्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याद्वारे 12 आणि 15 डब्यांच्या लोकल बांधण्यात येतील. 18 डब्यांच्या लोकलची व्यवहार्यतादेखील तपासण्यात येणार आहे. डबेखरेदी, लोकलबांधणी आणि देखभाल यासाठीची निविदाप्रक्रिया सुरू आहे.
नव्याने बांधणी होणाऱ्या 12 आणि 15 डब्यांच्या एसी लोकलमध्ये मालडब्याची विशेष व्यवस्था असणार आहे. या लोकलमधून एका डब्यातून अन्य डब्यात जाण्याची व्यवस्था असणार आहे.
मालडब्यासाठी (luggage coach) लोकलच्या पुढे आणि मागे स्वतंत्र डबे असणार आहेत. यामुळे मालडब्यातील विविध वस्तूंचा वास इतरत्र पसरणार नाही.
सध्या वापरात असलेल्या डब्याप्रमाणेच याची रचना असून येथील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी स्वतंत्र वातानुकूलित यंत्रणा असणार आहे.
हेही वाचा