Advertisement

एसी लोकलचे भाडे यापुढे कमी करणं अशक्य - व्हीके त्रिपाठी

रेल्वे बोर्ड अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्हीके त्रिपाठी हे मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी मध्य व पश्चिम रेल्वेवरील विविध प्रकल्प आणि कामांचा आढावा घेतला.

एसी लोकलचे भाडे यापुढे कमी करणं अशक्य - व्हीके त्रिपाठी
SHARES

एसी लोकल आणि प्रथम श्रेणीचे तिकीट दर नुकतेच कमी करण्यात आले. पण यामध्ये एसी लोकलचे पास दर कमी केले जाणार नाहीत हे स्पष्ट करण्यात आलं. पण नागरिकांकडून आता एसीच्या पास दरात पण कपात करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मात्र यामध्ये कपात होणे अशक्य असल्याचे रेल्वे बोर्ड अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. के. त्रिपाठी यांनी रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

चांगल्या सुविधा मिळवण्यासाठी खर्च करण्याची किंवा ते भरण्याची क्षमता आपण वाढवली पाहिजे. दर कमी करणे किंवा सवलती दिल्यास आपली अवस्था अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या श्रीलंकेसारखी होईल, असे उदाहरण त्यांनी दिले.

त्रिपाठी हे मुंबई दौऱ्यावर आले असून त्यांनी मध्य व पश्चिम रेल्वेवरील विविध प्रकल्प आणि कामांचा आढावा घेतला.

मेल, एक्स्प्रेस गाडय़ांमधून प्रवास करताना ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सवलतींबद्दल विचारले असता, अशा किती सवलती द्यायचा हा विचार केला पाहिजे. ही सवलत सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही ते म्हणाले.

ज्येष्ठ नागरिकांना मूळ भाडय़ाच्या तिकिटावर ५० टक्के सवलत दिली जात होती. मार्च २०२० पासून करोनाची लाट सुरू होताच रेल्वे प्रवासावर निर्बंध आले. रेल्वे गाडय़ांना गर्दी होऊ नये यासाठी करोनात ज्येष्ठ नागरिकांची सवलत तात्पुरती बंद करण्यात आली. मात्र वैद्यकीय कारणास्तव प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सवलत सुरूच ठेवली. अशा अकरा सवलती सुरूच आहेत.

एसी लोकलमधून पाच किलोमीटरचा प्रवास ६५ ऐवजी आता केवळ ३० रुपयांमध्ये करता येणार आहे.

एसी लोकलच्या भाड्यामुळे प्रवाशांना एसी लोकलचा प्रवास परवडत नव्हता. यामुळे एसी लोकलला पुरेसा प्रतिसादही मिळात नव्हता. प्रवाशांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाकडे एसी लोकलचे भाडे कमी करण्याची मागणी केली. आता अखेरीस प्रवाशांची ही मागणी मान्य झाली आहे.

रावसाहेब दानवे यांनी तिकीट दरात कपात करताना या निर्णयाविषयी सविस्तर माहिती दिली. 'याआधी २५ किलोमीटरच्या प्रवासासाठी मुंबईकरांना १३५ रुपये मोजावे लागत होते. मात्र तिकिटाची ही रक्कम यापुढे ६५ रुपये इतकी असणार आहे. तसंच ५० किलोमीटर अंतराचा प्रवास करणाऱ्यांकडून याआधी २०५ रुपये तिकीट आकारले जात होते, हे भाडे आता १०० रुपये इतके असणार आहे,' अशी माहिती दानवे यांनी दिली.



हेही वाचा

उन्हाळी सुट्टीत उत्तर प्रदेशसाठी कुर्ला स्थानकातून टीचर्स स्पेशल ट्रेन सुटणार

Mumbai Local News: आता तिकीट बुकिंगसाठी UPI पेमेंट सुविधा उपलब्ध

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा