Advertisement

पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या आणखी ८ फेऱ्या, ‘या’ तारखेपासून सुरू

सध्या पश्चिम रेल्वेकडे चार वातानुकूलित लोकल आहेत. दररोज त्यांच्या ३२ फेऱ्या होतात.

पश्चिम रेल्वेवर वातानुकूलित लोकलच्या आणखी ८ फेऱ्या, ‘या’ तारखेपासून सुरू
SHARES

वातानुकूलित लोकलच्या आणखी आठ फेऱ्या वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. येत्या २० जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहीती पश्चिम रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली.

सध्या पश्चिम रेल्वेकडे चार वातानुकूलित लोकल आहेत. दररोज त्यांच्या ३२ फेऱ्या होतात. त्यात आता आणखी आठ फेऱ्यांची भर पडणार असून एकूण फेऱ्या ४० पर्यंत पोहोचेल.

सोमवारपासून शुक्रवारपर्यंत या फेऱ्या होतील. शनिवारी आणि रविवारी मात्र ३२ फेऱ्याच होतील. तर या दिवशी वातानुकूलित लोकल फेऱ्याऐवजी आठ सामान्य लोकलच्या फेऱ्या होतील, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

वातानुकूलित लोकलच्या तिकीट दरात ५ मेपासून ५० टक्के कपात करण्यात आली होती. यानंतर पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या काही फेऱ्यांनाही प्रतिसाद वाढू लागला.

पूर्वी वातानुकूलित लोकलसाठी दिवसाला दीड ते तीन हजार तिकीटांची विक्री होत होती. आता आठ ते नऊ हजार तिकीटांची, तर ५०० ते एक हजार पासची विक्री होत आहे. वाढत्या प्रतिसादामुळे पश्चिम रेल्वेने १६ मेपासून वातानुकूलित लोकलच्या आणखी १२ फेऱ्या वाढविण्यात आल्या होत्या. त्यामुळे दररोज होणाऱ्या २० फेऱ्यांची संख्या ३२ पर्यंत पोहोचली होती.

जलद लोकल

अप दिशेने - 

Sr.

No.

Originating

Destination

MODE

Station

Departure

Station

Arrival

 

1

विरार

06:57

दादर

08:06

जलद (सोमवार ते शुक्रवार)

2

विरार

09:34

चर्चगेट

10:59

जलद (सोमवार ते शुक्रवार)

3

मालाड

18:44

चर्चगेट

19:22

जलद (सोमवार ते शुक्रवार)

4

वसई रोड

20:41

चर्चगेट

21:54

जलद (सोमवार ते शुक्रवार)

 

जलद लोकल

डाउन दिशेने - 

Sr.

No.

Originating

Destination

MODE

Station

Departure

Station

Arrival

 

1

दादर

08:18

विरार

09:24

जलद (सोमवार ते शुक्रवार)

2

चर्चगेट

11:03

मालाड

11:47

जलद (सोमवार ते शुक्रवार)

3

चर्चगेट

19:05

वसई रोड

20:22

जलद (सोमवार ते शुक्रवार)

4

चर्चगेट

21:57

विरार

23:22

जलद (सोमवार ते शुक्रवार)




हेही वाचा

मुंबईतल्या 'या' स्थानकावर १५ दिवस लोकल ट्रेन थांबणार नाही

मुंबई मेट्रो लाइन 2A, 7 चा दुसरा टप्पा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा