Advertisement

कर्तव्यदक्ष आरपीएफ जवानाने वाचवले प्रवाशाचे प्राण

कर्तव्यदक्ष आरपीएफ जवानाने दाखवलेल्या सतर्कतेमुळेच एका महिला प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. या महिलेसह अन्य दोन जणांचेही प्राण वाचवण्यात यश आलं आहे. या दुर्घटनेत तिघेही किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.

कर्तव्यदक्ष आरपीएफ जवानाने वाचवले प्रवाशाचे प्राण
SHARES

आपल्या इच्छितस्थळी वेळेवर पोहोचता यावं म्हणून अनेक प्रवासी गर्दीत ट्रेनमध्ये लोंबकळत प्रवास करत असतात. यामुळे अनेक प्रवाशांना आपले प्राण गमावले आहेत. आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. मात्र कर्तव्यदक्ष आरपीएफ जवानाने दाखवलेल्या सतर्कतेमुळेच एका महिला प्रवाशाचे प्राण वाचले आहेत. या महिलेसह अन्य दोन जणांचेही प्राण वाचवण्यात यश आलं आहे.


कुठे घडली ही घटना?

दादरच्या फलाट क्रमांक ४ वर आरपीएफचे जवान राहुल जाधव कार्यरत होते. त्यावेळी ७.१० मिनिटांनी कर्जतला जाणारी लोकल आली होती. लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. याच गर्दीतून गायत्री सतनकर (२०) ही कल्याणला राहणारी मुलगी प्रवास करत होती. तिच्यासोबत १५ वर्षीय तिची लहान बहीण पौर्णिमा सतनकर आणि नातेवाईक रोहन गोरसकर हा देखील होता.

गर्दीत या तिघांनाही रेल्वेच्या डब्यात चढता न आल्याने ते लोंबकळत होते. मात्र लोकल सुरू होताच गर्दीच्या तग न धरू शकलेल्या गायत्रीचा तोल गेल्याने ती चालत्या लोकलमधून खाली पडली. तिच्यासोबत तिचे दोन्ही भावंडही खाली पडले.


आरपीएफचे जवान आले धावून

हे तिघेही प्लॅटफॉर्म आणि लोकल ट्रेनमधील पोकळीत पडणार तोच राहुल यांनी या तिघांना बाजूला घेतलं. राहुल यांच्या मदतीला त्यावेळी महिला अधिकारी वनिता शुक्ला आणि किरण जॉय धावून गेल्याने त्यांचे प्राण वाचले.

या दुर्घटनेत तिघेही किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं आरपीएफचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश मेनन यांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा