Advertisement

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन वेळा धावणार, वेळापत्रक जाहीर

पावसाळ्यात प्रवासाचा कालावधी अंदाजे दहा तासांचा असणे अपेक्षित आहे.

मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आठवड्यातून तीन वेळा धावणार, वेळापत्रक जाहीर
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) मंगळवारी (२७ जून) बहुप्रतिक्षित मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही गोव्यातील पहिली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन असेल. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते गोव्यातील मडगाव दरम्यान धावेल.

सीएसएमटी-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस सध्या आठवड्यातून फक्त तीन दिवस धावणार असून, पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावर वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे.

मुंबई आणि गोव्याला जोडणारी वंदे भारत ट्रेन पावसाळ्यात सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सीएसएमटी (मुंबई) येथून सुटणार आहे. ही गाडी सीएसएमटीहून पहाटे ५.२३ वाजता सुटेल आणि १० तासांनंतर दुपारी ३.३० वाजता मडगावला पोहोचेल.

तर परतीच्या प्रवासासाठी वंदे भारत ट्रेन मडगाव (गोवा) येथून दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि रात्री १०.२५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल. मडगाव दरम्यान ही गाडी मडगावहून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावेल.

या 8 डब्यांच्या ट्रेनला 11 थांबे असतील आणि मुंबई-गोवा अंतर कापण्यासाठी 7 तास 50 मिनिटे लागतील.

१ नोव्हेंबरपासून ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावणार

पावसाळ्यानंतर म्हणजेच 1 नोव्हेंबरपासून मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस शुक्रवार वगळता आठवड्यातून 6 दिवस धावेल.

कोकणात इथे थांबा

या गाडीला दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे थांबे असतील. मात्र, पावसाळ्यात प्रवासाचा कालावधी अंदाजे दहा तासांचा असणे अपेक्षित आहे. बिगर पावसाळ्याच्या कालावधीत ही ट्रेन 586 किलोमीटरचे अंतर अवघ्या 7 तास 15 मिनिटांत पार करेल.

सध्या सर्वात वेगवान ट्रेन तेजस एक्सप्रेसला हेच अंतर कापण्यासाठी 8 तास 50 मिनिटे लागतात. तेजस एक्स्प्रेसच्या तुलनेत जागतिक दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या वंदे भारत ट्रेनचा वेग जास्त असून वेळेची बचत होईल.

मुंबई-गोवा मार्गे कोकण वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनचे तिकीट बुकिंग अद्याप सुरू झालेले नाही. पण लवकरच एक-दोन दिवसांत, IRCTC च्या अधिकृत वेबसाइट - www.irctc.co.in आणि स्टेशनवरील तिकीट बुकिंग केंद्रावरून आरक्षण करता येईल.



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा