Advertisement

मुंबई-मांडवा लाँचला अपघात


मुंबई-मांडवा लाँचला अपघात
SHARES

गेट वे ऑफ इंडिया ते मांडवा जेट्टी या दरम्यान चालणारी अजंठा प्रवासी बोट मांडवा जेट्टीपासून 1 किलोमीटर अंतरावर असताना अचानक बुडू लागली. आज सकाळी 10 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. 

बोटीवर ऐकूण 88 प्रवासी प्रवास करत होते. बोटीवरील प्रवास करणारे पुरुष, महिला आणि लहान मुले यांनी घाबरून आरडाओरड चालू केला.

दरम्यान सागरी गस्तीवर निघालेल्या रायगड जिल्हा पोलीस दलातील सद्गुरू कृपा बोटीवरील नेमणुकीस असलेले पोलीस कर्मचारी प्रशांत घरत हे प्रवाशांच्या मदतीला आले. ट्रॉलरवरील तांडेल आणि खलाशी यांच्या मदतीनं बुडणाऱ्या प्रवाशी बोटींजवळ त्वरीत पोहोचले. स्वतः च्या जीवाची पर्वा न करता अत्यन्त  सावधगिरीने त्यावरील 88 पुरुष, महिला आणि बालके यांचा जीव वाचवला. पोलीस गस्तीवरील नौकेच्या सहाय्यानं प्रवाशांना जेट्टीवर सुखरूप आणले.

सदर दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सुटका झालेल्या सर्व प्रवाशी यांनी आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी पोलीस कर्मचारी घरत यांची कार्यतत्परता, निर्णय क्षमता आणि धाडसाचे कौतुक केले आहे. रायगड जिल्हा पोलिस दलातील सागरी सुरक्षा दल नेहमीच कार्यतत्पर असल्याची प्रचिती आज या घटनेवरून पुन्हा एकदा दिसून आली.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा