Advertisement

मे महिनाअखेर मेट्रो २ ए, मेट्रो ७ सुरू

मेट्रो ७ दहिसर - अंधेरी आणि मेट्रो २ ए दहिसर - डी एन नगर या मार्गावर धावणार आहे. दोन्ही मार्गिकांचं काम झालं असून आता या मार्गावर ट्रायल रन होणार आहे.

मे महिनाअखेर मेट्रो २ ए, मेट्रो ७  सुरू
SHARES

मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुखकारक होणार आहे. येत्या मे महिनाअखेर मेट्रो २ ए आणि मेट्रो ७ हे मार्ग सुरू होणार आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत मेट्रोचे कोचेस मुंबईत दाखल होणार आहेत.

मेट्रो ७ दहिसर - अंधेरी आणि मेट्रो २ ए दहिसर - डी एन नगर या मार्गावर धावणार आहे. दोन्ही मार्गिकांचं काम झालं असून आता या मार्गावर ट्रायल रन होणार आहे. या दोन्ही मार्गांसाठी फेब्रुवारीत ट्रायल रन सुरू होणार आहे. एकूण ५७६ कोचेस टप्प्याटप्याने मुंबईत दाखल होत आहेत. 

 दोन्ही मार्गावरची मेट्रो ड्रायव्हरलेस असेल. मात्र, सुरूवातीला चालकासह मेट्रो चालवली जाईल. त्यानंतर अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर ड्रायव्हरलेस मेट्रो सुरू होईल. मेट्रो ७ आणि मेट्रो २ ए साठीच्या ट्रायल रनसाठी बुधवारी रात्री बंगळुरुहून मेट्रो ट्रेन्स मुंबईत दाखल होणार आहेत. हेही वाचा -

खासगी रुग्णालयांना महापालिका लसीकरण केंद्रे घोषित करण्याची शक्यता

प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेनं घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णयRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा