घाटकोपर-अंधरी-वर्सोवा (ghatkopar-andheri-varsova) या मुंबई मेट्रो १ (mumbai metro) मधून आता प्रीपेड कार्डनं प्रवास करता येणार आहे. या कार्डमुळं तिकीट घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. रिचार्ज करणे ही अगदी सोपे असल्यानं हाताळण्यासाठी योग्य 'ट्रॅव्हल कार्ड' असल्याचा दावा मेट्रो वन प्रशासनाने केला आहे.
सोमवारी वन मुंबई स्मार्ट कार्डचे लोकार्पण करण्यात आले. मरोळ मेट्रो स्थानकातून पहिल्या मेट्रो स्मार्ट प्रीपेड कार्डची खरेदी करण्यात आली आहे. 'टॅप अॅन्ड गो' यानुसार हे कार्ड काम करणार आहे. मेट्रो ट्रॅव्हल कार्डमध्ये चीप आणि स्लीप या दोन्ही गोष्टी आहेत.
यामुळे लवकरच बाजारात तसेच बॅंक व्यवहारासाठी या कार्डचा वापर करणे शक्य होणार आहे. यासाठी संबंधित बॅंकेशी केवायसी पूर्ण करणे आवश्यक असणार आहे. अॅक्सिस आणि रुपेच्या मदतीने हे कार्ड विकसित करण्यात आल्याचं समजतं आहे.
हेही वाचा -
महापालिकेच्या शाळांमध्येही डिजिटल वर्ग सुरू होणार
२६/११ हिरो तुकाराम ओंबळे यांचा अनोखा सन्मान, नव्या कोळी प्रजातीला दिले नाव