Advertisement

प्रवाशांनो, आता मेट्रोच्या रिर्टन तिकिटावर सूट नाही


प्रवाशांनो, आता मेट्रोच्या रिर्टन तिकिटावर सूट नाही
SHARES

प्रवाशांचा मेट्रोला जास्तित जास्त प्रतिसाद मिळावा यासाठी मुंबई मेट्रोनं परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना २.५ रुपयांची सूट दिली होती. मात्र, १ डिसेंबरपासून रिटर्न जर्नी तिकीट (एसजेटी)च्या माध्यमातून मिळणारी सूट आता प्रवाशांना मिळणार नाही.


३५ ऐवजी ४० रुपये

१ डिसेंबरपासून २ ते ५ किलोमीटरपर्यंतच्या परतीच्या प्रवासासाठी ३५ रुपयांच्या ऐवजी ४० रुपये मोजावं लागणार आहे. तसंच, ५ ते ८ किलोमीटर परतीच्या प्रवासासाठी ६० ते ७० रुपये मोजावे लागणार आहे.

स्टोर व्हॅल्यू पास (एसवीपी) किंवा मंथली ट्रिप पास काढल्यास प्रवाशांना यावर सूट मिळणार आहे. तसंच, प्रवासी ‘स्किप क्यू’ या अॅपद्वारे देखील तिकीटी खरेदी करू शकतात.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा