Advertisement

सावाधान! विरुद्ध दिशेनं वाहन चालवाल तर, होईल कडक कारवाई

मुंबईकरांनो तुम्ही जर रस्त्यावर विरुद्ध दिशेनं वाहन चालवत आसाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल.

सावाधान! विरुद्ध दिशेनं वाहन चालवाल तर, होईल कडक कारवाई
SHARES

मुंबईकरांनो तुम्ही जर रस्त्यावर विरुद्ध दिशेनं वाहन चालवत आसाल तर वेळीच सावध व्हा, अन्यथा कडक कारवाईला सामोरं जावं लागेल. कारण विरुद्ध दिशेनं वाहनं चालवणाऱ्या चालकांविरोधात आता थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी यासंदर्भात पांडे यांनी फेसबुक लाइव्हद्वारे माहिती दिली. तसंच, यापुढे मुंबई पोलीस आयुक्त पांडे दर रविवारी मुंबईकरांशी फेसबुकद्वारे संवाद साधणार असून, आठवड्याच्या कामांची माहिती देणार आहेत.

मुंबईत अनेकदा वाहनचालक विरुद्ध दिशेनं (Wrong Way) गाडी चालवतात. निश्चित स्थळ वळेत गाठण्यासाठी अनेकदा हे दुचाकीस्वार विरुद्ध दिशेनं गाडी चालवतात. शिवाय गाडीचा वेगही यावेळी जास्त असतो. त्यामुळं अपघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळं विरुद्ध दिशेनं वाहनं चालवणाऱ्या चालकांवर आता बेदरकारपणे गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त पांडे यांनी रविवारी दिली. तसंच, विरुद्ध दिशेन गाडी चालवू नये, असे आवाहनही या वेळी पांडे यांनी केले.

''नियम मोडल्यास तुम्ही फार अडचणीत याल. गाडी जप्त होईल, चालकाला अनेक ठिकाणी फिरावे लागेल, कायदेशीररीत्या न्यायालयासमोर जावे लागेल. मी माझे अधिकारी व अंमलदारांना या प्रकरणी भादंविच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या सूचना केल्या आहेत. सोमवारपासून ही कारवाई सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय विनाहेल्मेट चालकांवरही कारवाई केली जावी'' असेही संजय पांडे यांनी म्हटलं.

संजय पांडे यांनी त्यांचा मोबाइल क्रमांक जाहीर करून नागरिकांना त्यावर सूचना करण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने वाहनं चालवणाऱ्यांमुळं आमच्या जीवाला धोका असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली होती. याशिवाय ध्वनिप्रदूषणाबाबतही कठोर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले. विशेष करून बांधकामाच्या ठिकाणी वेळेचे बंधन न पाळता कधीही कामे करण्यात येतात, यावर पांडे यांनी नाराजी व्यक्त केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा