Advertisement

'डेक्कन क्वीन'चा प्रवास होणार आणखी जलद

मुंबई-पुणे प्रवास 'डेक्कन क्वीन'नं करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या 'डेक्कन क्वीन'ला पूश-पूल इंजिन लावण्यात आल्यानं प्रवासाचा वेग आणखी वाढणार आहे.

'डेक्कन क्वीन'चा प्रवास होणार आणखी जलद
SHARES

मुंबई-पुणे प्रवास 'डेक्कन क्वीन'नं करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या 'डेक्कन क्वीन'ला पूश-पूल इंजिन लावण्यात आल्यानं प्रवासाचा वेग आणखी वाढणार आहे. प्रवाशांना मुंबई ते पुणे प्रवास २ तास ३५ मिनिटांत करता येणार असून, प्रवासाची ४० मिनिटे कमी होणार आहेत. २ दिवसांपूर्वी या यंत्रणेची चाचणी करण्यात आली होती. यावेळी मुंबई ते पुणे १९२ किमीचे अंतर २ तास ३५ मिनिटांत पार केल्याची माहिती मध्य रेल्वनं दिली.


प्रवाशांची मागणी

मुंबई ते पुणे डेक्कन क्वीनने प्रवास करताना भोर घाट इथं बँकर इंजिन लावण्यात येतं. त्यानंतर बँकर इंजिन लोणावळा इथं काढण्यात येतं. त्यामुळं मुंबई ते पुणे अंतर पार करण्यासाठी ३ तास १५ मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, गेली अनेक वर्ष मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनचाही वेग वाढवण्याची मागणी प्रवासी करत होते. मात्र, या मार्गावर असलेल्या घाट क्षेत्रांमुळं वेग कसा वाढणार असा प्रश्न उपस्थित होत होता. परंतु, या गाडीला राजधानी एक्स्प्रेसप्रमाणं 'पूश अ‍ॅण्ड पूल' यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला.


घाट भागातील वेळ वाचणार

डेक्कन क्वीन गाडीचे डबे एलएचबी प्रकारातील नाहीत. दोन्ही बाजूला इंजिन असलेल्या पूश अ‍ॅण्ड पूल यंत्रणा ही सध्याच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसू शकत नाही. त्यासाठी एलएचबी या नव्या प्रकारातील डबे आवश्यक असतात. त्यामुळं मुंबई ते दिल्ली मार्गावर धावणाऱ्या एलएचबी डब्यांच्या राजधानी एक्स्प्रेसची एक राखीव रिकामी गाडी घेऊन त्याची चाचणी मुंबई ते पुणे मार्गावर घेण्यात आली. डेक्कन क्वीनला पूश-पूल इंजिन जोडल्यानं घाट भागात वाया जाणारा वेळ वाचणार आहे. पूश-पूल इंजिन जोडल्यानं लोणावळा-पुणे भागात ११० किमी प्रति तासानं डेक्कन क्वीन चालविण्यात येणार आहे.



हेही वाचा -

बेस्ट बसचालकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू

मेट्रोचे तिकीट मिळणार डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा